कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर महापालिकेला आली जाग, सुरक्षा रक्षकांना दिले आत्मरक्षणाचे धडे

भविष्यातील होणारे चाकू हल्ले रोखण्यासाठी पालिकेच्या तसेच बोर्डाच्या सर्व सुरक्षा रक्षकांना आत्मरक्षण, चाकू हल्ला संरक्षण सेल्फ डिफेन्स, क्नैफ डिफेन्सचे धडे देण्यात आले. आजपासून १०० हुन अधिक सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देण्यात आले आहे.

    ठाणे : अतिक्रमण फेरीवाला कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ल्यानंतर पालिका खडबडून जागी झाली आहे. भविष्यातील होणारे चाकू हल्ले रोखण्यासाठी पालिकेच्या तसेच बोर्डाच्या सर्व सुरक्षा रक्षकांना आत्मरक्षण, चाकू हल्ला संरक्षण सेल्फ डिफेन्स, क्नैफ डिफेन्सचे धडे देण्यात आले. आजपासून १०० हुन अधिक सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देण्यात आले आहे.

    ठाणे महानगर पालिकेची सुरक्षा अजुन बळकट करण्याकरिता पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार आजपासून या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली असून एखाद्या वेळी अधिकाऱ्यांवर अचानक होणारे हल्ले कसे रोखावे, कश्या प्रकारे स्वतः चे व अधिकाऱ्याचे रक्षण करावे या करीता मार्शल आर्ट, ज्युडो यांचे प्रशिक्षन व प्रातेक्षिक करून घेण्यात आले दि. लेजंट ऑफ मार्शल आर्ट, मुंब्रा या संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले.

    यात ५४ अंगरक्षक तसेच ४५ महाराष्ट्र सुरक्षा बलच्या सुरक्षाकर्मिनी सहभाग घेतला होता. ठाणे पालिकेच्या सुरक्षा विभाग तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मुख्य सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र भिमाजी थोरवे यांनी देखील सहभाग घेतला होता.

    काही दिवसांपूर्वी कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ला हा भ्याड हल्ला होता. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचा आणि सुरक्षा रक्षकांचा बचाव हल्लेखोरांपासून रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात यावी यासाठी ठाणे महापालिकेने पाऊल उचलले असल्याव्हे8 यावेळी मुख्य सुरखा अधिकाऱ्यांनी सांगितले.