वाळू माफिया जिल्हा प्रशासनाच्या रडारवर, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

तहसीलदारांच्या दाऊदक कारवाईने वाळू माफियांमध्ये धडकी भरली आहे. उपविभागीय अधिकारी ठाणे विभाग ठाणे तहसीलदार (Thane Tehsildar)  रेतीगट व तहसीलदार ठाणे यांच्या संयुक्त पथकामार्फत दिवा-शीळ (Diva-Shil Road) रोड वरील खार्डी येथील खाडीमध्ये व बंदरावर वाळू चोरी प्रकरणी कडक कारवाई करून एकूण १५ अनधिकृत रेतीचे प्लॉट कुंड्या जेसीबीच्या साह्याने खाडीतच नष्ट करण्यात आल्या.

ठाणे : ठाण्यात (Thane) विविध खाड्यांमध्ये वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळू माफियांना रडारवर घेतले आहे. विविध भागात वाळू माफियांवर छापेमारी (Raid) केल्यानंतर ठाणे तहसीलदार यांनी धडक कारवाई करीत तब्बल साडेसात लाखाचा मुद्देमाल आणि वाळू जप्त केली. तहसीलदारांच्या दाऊदक कारवाईने वाळू माफियांमध्ये धडकी भरली आहे. उपविभागीय अधिकारी ठाणे विभाग ठाणे तहसीलदार (Thane Tehsildar)  रेतीगट व तहसीलदार ठाणे यांच्या संयुक्त पथकामार्फत दिवा-शीळ (Diva-Shil Road) रोड वरील खार्डी येथील खाडीमध्ये व बंदरावर वाळू चोरी प्रकरणी कडक कारवाई करून एकूण १५ अनधिकृत रेतीचे प्लॉट कुंड्या जेसीबीच्या साह्याने खाडीतच नष्ट करण्यात आल्या.

सदर कुंड्यांमध्ये अंदाजे ७० ते ७५  ब्रास इतका रेती साठा होता.एकूण १ कोटी १२ लाखांच्या मूद्देमालावर कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांनी दिली. संयुक्त पथकाने कारवाईत ५ सेक्शन पंप व ४ मोठ्या बोटी या समुद्र ओहोटीच्या वेळी खाडीतून बाहेर काढता येणे शक्य होत नसल्याने त्या पाण्यातच बुडवण्यात आल्या.

या कार्यवाही मध्ये ७५  ब्रास रेती साठ्याची किंमत बाजार भावाप्रमाणे प्रति ब्रास ९९०० प्रमाणे एकूण ७,४२,५०० इतकी किंमत तसेच ५ सेक्शन पंप प्रत्येकी पाच लाख प्रमाणे एकूण २५ लाख व ४ मोठ्या बोटी/बार्जेस प्रत्येकी २० लाख प्रमाणे ८० लाख असा एकूण १ कोटी १२ लाख रकमेचा मुद्देमाल खाडी मधील पाण्यातच नष्ट करण्यात आला