पालघर जिल्ह्यात ७ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात धोंड मार्याची मेट, पळसुंडा, शांतीनगर, डहाणू तालुक्यात चंद्रनगर, चिंचणी - मोरीपाडा, मांगेलआळी, वरोर - मांगेल आळी, आणि वसई तालुक्यात सारोंडापाडा अशा ७

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात धोंड मार्याची मेट, पळसुंडा, शांतीनगर, डहाणू तालुक्यात चंद्रनगर, चिंचणी – मोरीपाडा, मांगेलआळी, वरोर – मांगेल आळी, आणि वसई तालुक्यात सारोंडापाडा अशा ७ क्षेत्रात कोव्हीड-१९ चे रुग्ण आढळून आल्याने संबंधित क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

शासनाच्या आदेशात नमुद केलेल्या सामान्य क्षेत्रासाठी लागू असलेल्या सवलती प्रतिबंधित क्षेत्रास लागू राहणार नाहीत. या बाबींवर सद्यस्थितीत अंमलात असलेले प्रतिबंध लागू राहतील.