कल्याण डोंबिवलीत ७१ नवीन रुग्ण – डोंबिवलीतील ३ जेष्ठ नागरिकांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये ७१ नवीन रुग्णांची भर पडली असून डोंबिवलीतील ३ जेष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या या ७१ रूग्णांमुळे

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये ७१ नवीन रुग्णांची भर पडली असून डोंबिवलीतील ३ जेष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  आजच्या या ७१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १३९९ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून ६३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६९८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २४, कल्याण पश्चिमेतील १५, डोंबिवली पूर्वेतील १५,  डोंबिवली पश्चिमेतील १२, तर टिटवाळा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये  ३४ पुरुष, २९  महिला, २ मुलं,  आणि ६ मुली आहेत. तर डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव येथील ७३ वर्षीय पुरुष, डोंबिवली पश्चिमेतील राम मंदिराजवळ ७२ वर्षीय पुरुष, दीनदयाळ रोड येथील ६० वर्षीय पुरुष या तीन जेष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, नंदादीप नगर, नेतिवली टेकडी, नाना पावशे रोड, कचोरे रोड, वालधुनी शिवाजी नगर, तिसगाव, आनंदवाडी, हाजी मलंग रोड, नांदिवली, सह्याद्री पार्क, संतोष नगर, गावदेवी नगर, कोळसेवाडी, कल्याण पश्चिमेतील शिवाजी नगर, रोहिदास वाडा, वाल्लीपीर रोड, नारायण पेठ, जोशीबाग, ठाणकर पाडा, रामबाग ४ क्रॉस रोड, गजानन मंदिर रोड, डी. बी. चौका जवळ, बैल बाजार, पौर्णिमा टोकीज जवळ, खडकपाडा, उंबर्डे,  डोंबिवली पूर्वेतील खंबाळ पाडा, आजदे, एम.आय.डी.सी., राम नगर, उमेश नगर, चिंचपाडा, चोळे गाव, मानपाडा रोड, आयरे गाव, डोंबिवली पश्चिमेतील  उमेश नगर, महाराष्ट्र नगर, कुंभारखान पाडा, नेमाडे गल्ली, ठाकूरवाडी, राम मंदिर, दिनदयाल रोड,  टिटवाळा येथील जेतवन नगर मांडा, गणेश विद्यालयाजवळ मांडा, उर्दू शाळे जवळ मांडा, मांडा आदी परिसरातील आहेत.