कल्याण डोंबिवलीत ७७ नवीन रुग्ण – चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत तब्बल ७७ नवीन रुग्णांची भर पडली असून चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजच्या या ७७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील

 कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत तब्बल ७७ नवीन रुग्णांची भर पडली असून चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  आजच्या या ७७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १६३९  झाली आहे. यापैकी आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला असून ८६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ७२७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २२, कल्याण पश्चिमेतील २३, डोंबिवली पूर्वेतील १३,  डोंबिवली पश्चिमेतील १२ तर मोहने आंबिवलीतील ७  रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ३६ पुरुष, ३२ महिला, २ मुलं तर ७ मुली आहेत. आजच्या या रुग्णांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये कल्याण पश्चिमेतील जोशी बागेतील ६० वर्षीय महिला, डोंबिवली पश्चिमेतील भोईरवाडी ठाकूरवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, कल्याण पूर्वेतील नेहरू नगर येथील ६६ वर्षीय महिला, डोंबिवली पश्चिमेतील कर्वे रोड येथील ४६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
 
आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील एफ केबिन रोड, आनंदवाडी, मंगलराघो नगर, आनंदवाडी रोड, खडेगोळवली, मराठा हॉल रोड कोळसेवाडी, कैलासनगर खडेगोळवली, आदर्श नगर, चिकणी पाडा, चक्की नाका, गवळी नगर, मराठा कोळसेवाडी, साकेत कॉलेजजवळ चिंचपाडा, परशुराम वाडी, कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन २, शिवाजीनगर वालधुनी, संत रोहिदास वाडा, टिळक चौक, जोशीबाग, शहाड ब्रिज जवळ, चिखलेबाग, बेतूरकर पाडा, नारायणवाडी, सांगळेवाडी, मुरबाड रोड रामबाग लेन ६, वल्लीपीर रोड,डोंबिवली पूर्वेतील टंडन रोड रामनगर, देसलेपाडा, इंदिरानगर, केळकर रोड, राजाजी पथ, फडके रोड, सोनारपाडा, खंबाळपाडा, डोंबिवली पश्चिमेतील सखाराम कॉंप्लेक्स, कोपररोड, सुभाष रोड विष्णू नगर, कैलासनगर, महाराष्ट्र नगर, आंबिवली मोहने येथील जेतवन नगर, लहूजी नगर आदी परिसरातील आहेत.