कल्याण डोंबिवलीत ७२ नवीन रुग्ण – कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात तब्बल ७२ नवीन रुग्णांची भर पडली असून चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजच्या या ७२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात तब्बल ७२ नवीन रुग्णांची भर पडली असून चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजच्या या ७२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १५६२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला असून ८४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६७३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.