वाडा- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वरसाले ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा राही रघु किनर या महिला आज संध्याकाळी सुमारास पाणी काढताना विहिरीत उतरत असताना ती विहिरीत पडली.यात तिच्या

वाडा- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वरसाले ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा राही रघु किनर या महिला आज संध्याकाळी सुमारास पाणी काढताना विहिरीत उतरत असताना ती विहिरीत पडली.यात तिच्या हाताला,डोक्याला,आणि कमरेला जबर मार लागला आहे.आज तिला वाडा ग्रामीण रुग्णालयात रात्री ८.५० ला दाखल करण्यात आले असून गंभीर दुखापत असल्याने त्या महिलेला ठाणे येथे हलविण्यात येत आल्याची माहिती मिळतेय. मात्र येथे पाणी टंचाई परिस्थिती असताना ग्रामपंचायत कडून वाडा पंचायत समिती व वाडा तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही आठवडा होऊनही पाणी टंचाई समस्या मार्गी न लागल्याचा आरोप वरसाले ग्रामपंचायत सरपंच प्रकाश शेलार यांनी केला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्यात ही आता लॉक डाऊन कालावधी वाढविण्यात आला आहे.कोरोना या महामारीचे संकटअसताना पालघर जिल्ह्यातील आदिवासी डोंगराळ भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईचे चटके इथल्या जनतेला बसत आहेत. वाडा तालुक्यातील वरसाले गावात ३००० लोक वस्ती आहे.१५ हूनअधिक गाव-पाडे या ग्रामपंचायत हद्दीत आहेत.त्याचप्रमाणे या गावतील नवापाडा,जांभुळ पाड़ा चारणवाडी,कुडुपाडा,आणि उंबरपाडा याभागात पाणी टंचाई आहे. पाणी मिळावे यासाठी नवापाडा येथील एक महिला सायंकाळी सुमारास पाणी आणण्यासाठी गेली असता ती विहिरीत पडली.यात तिच्या हाताला व डोक्याला आणि कंबरेला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली.असल्याचे सांगितले जाते .तिला उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयांमध्ये १९ मे २०२० ला रात्री ८.५० ला दाखल करण्यात आले आहे.हाताला अधिक मार असल्याने तिला उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आल्याचे सांगितले जाते.पाणी टंचाईची भीषणता पाहता येथे विहिरिने तळ गाठला आहे.अशा परिस्थीतीत पाण्यासाठी जीव धोक्यात लावण्याची वेळ इथल्या महिला वर्गावर आली आहे. अशी माहिती तेथील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश शेलार यांनी माहिती दिली.

पाणी टंचाई बाबत वाडा पंचायत समिती आणि वाडा तहसीलदार यांच्याकडे मागणी केली तरी या बाबत आठवडा उलटूनही पाणी टंचाई बाबत काही केले गेले नाही.पाणी टंचाई बाबत शासकीय यंत्रणेने दखल घेऊन टंचाई भागात टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी सरपंच  आदिवासी भागात पाणी टंचाई आहे.हे पाणी मिळविण्यासाठी महिला वर्गाला विहिरीत उतरून पाणी काढावे लागते.पाणी ही विहीरत नाही ते साठलेले पाणी हे एका भांड्यात भरून घ्यावे हे विदारक चित्र हे दिसतय.