डोंबिवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार तरुणींची सुटका

डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारत (Balaji darshan building) आहे. या इमारतीत हॉटेल विराज साईराज लॉजिंग अँड बोर्डींग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची बातमी मिळताच ठाण्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलने (anti human trafficking cell) सोमवारी रात्री अचानक तेथे छापा टाकला. यावेळी चार तरुणी तेथे वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या. सर्वसामान्य रहिवाशांच्या वस्तीत हे चालू असल्याने डोंबिवलीत आता खळबळ माजली आहे. टिळकनगर पोलिसांना याची माहिती कशी नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

  डोंबिवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. येथील एका लॉजिंग अँड बोर्डींगमध्ये सेक्स रॅकेट चोरी-छुपे चालू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे. या कारवाईत चौघा तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वसामान्य रहिवाशांच्या वस्तीत हे चालू असल्याने डोंबिवलीत आता खळबळ माजली आहे. टिळकनगर पोलिसांना याची माहिती कशी नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

  डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारत (Balaji darshan building) आहे. या इमारतीत हॉटेल विराज साईराज लॉजिंग अँड बोर्डींग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची बातमी मिळताच ठाण्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलने (anti human trafficking cell) सोमवारी रात्री अचानक तेथे छापा टाकला. यावेळी चार तरुणी तेथे वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या. सर्वसामान्य रहिवाशांच्या वस्तीत हे चालू असल्याने डोंबिवलीत आता खळबळ माजली आहे. टिळकनगर पोलिसांना याची माहिती कशी नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

  तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी

  पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह टिळकनगर पोलिसांनी या लॉजवर अचानक छापा टाकला. पोलिसांना पाहताच या लॉजमधील साऱ्यांची भंबेरी उडाली. पोलिसांनी छाप्यादरम्यान सदर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींचे पुरवठादार दोन दलालांच्या तावडीतून 4 तरुणींची सुटका केली. तर या कांडातून मुक्त करण्यात आलेल्या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली.

  संग्रहित फोटो

  टिळकनगर पोलीस ठाण्यात लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींचे पुरवठादार दोन दलालांच्या विरोधात 376 (2), 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. डोंबिवलीसारख्या सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीमध्ये अशाप्रकारे सुरू असलेल्या देहव्यापाराकडे या परिसरातील पोलीस दुर्लक्ष का करतात ? असा प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.