Shadow confusion on the first day in Thane Vaccination of only 300 people; Disappointment as there is no registration in the app

१८ ते ४४ वर्षातल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची दवंडी पिटवली. मात्र, ॲपमध्ये नोंदणीचा होत नसल्याने १ मे महाराष्ट्र दिना दिवशीच महत्वाकांक्षी लसीकरणाचा फज्जा उडाला. सावळ्या गोंधळामुळे ग्लोबल रुग्णालयात गर्दी उसळली. २० लाख ठाणेकरांपैकी केवळ ३०० जणांचे लसीकरण करण्यात आले. रांगेतील नागरिकांना मात्र लस न घेताच परत घरी परतावे लागले.

    ठाणे : १८ ते ४४ वर्षातल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची दवंडी पिटवली. मात्र, ॲपमध्ये नोंदणीचा होत नसल्याने १ मे महाराष्ट्र दिना दिवशीच महत्वाकांक्षी लसीकरणाचा फज्जा उडाला. सावळ्या गोंधळामुळे ग्लोबल रुग्णालयात गर्दी उसळली. २० लाख ठाणेकरांपैकी केवळ ३०० जणांचे लसीकरण करण्यात आले. रांगेतील नागरिकांना मात्र लस न घेताच परत घरी परतावे लागले.

    १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ॲपमध्ये नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले. पण ॲपमध्ये नोंदणीचा होत नसल्याच्या तक्रारी आल्या. यामुळे नोंदणीसाठी ॲपच फोल ठरले. लसीकरणासाठी महापालिका सज्ज असल्याचा कांगावा करून लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र, ॲपमध्ये नोंदणीच होत नसल्याने अनेक नागरिकांना परत जावे लागले. २० लाख ठाणेकरांपैकी केवळ ३०० नागरिकांचे लसीकरण पहिल्या दिवशी करण्यात आले. तर शेकडो रिकाम्या हाताने घरी परतले.

    ठाणे पालिकेच्या स्थायी समितीत याच लसीकरण मोहिमेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. स्थायी सभापती यांनी आरोग्य विभागाला सूचनाही केल्या होत्या. मात्र नियोजनाच्या अभावामुळे शनिवारी पुन्हा लसीकरणाचा गोंधळ समोर आला.

    १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची नोंदणी पालिकेने दिलेल्या ॲपमध्ये होणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र पालिकेच्या ॲपमध्ये लसीकरणासाठी नोंदणीचा झाली नाही. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांनी पहिल्याच दिवशी ग्लोबल कोव्हीड सेंटरवर गर्दी केली. ॲपमध्ये नोंदणी न झाल्याने नागरिकांच्या रांगा बघून अखेर केंद्रावरच नोंदणी करण्याचे काम सुरु केले दिवसभरात गोंधळात केवळ ३०० नागरिकांचीच नोंदणी करण्यात आली. त्यामुळे अन्य रांगेतील नागरिकांना लसीकरणाविनाच घरी जावे लागल्याचा सावळागोंधळ शनिवारी समोर आला.