भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळेंसह इतर पदाधिकाऱ्यांंचे सरकार विरोधात आंदोलन

डोंबिवली : राज्यात कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाने दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून सांगत माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या

 डोंबिवली : राज्यात कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाने दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून सांगत माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली शहर सचिव राजू शेख, वार्ड अध्यक्ष अमोल तायडे, विलास खंडीजोर, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत पगारे, युवा मोर्चा शहर सचिव रुपेश पवार  आदींनी या सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.

याबाबत शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना यावर नियंत्रण का मिळवू शकत नाही हे सरकारने जनतेला सांगणे आवश्यक आहे. गरीब रुग्णांवर आरोग्य मंत्री राजेश टोपे हे मोफत उपचार देऊ असे सांगत असताना कल्याण-डोंबिवलीततील मात्र दर आकारले जातात. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे जनतेच्या भल्यासाठी निर्णय घेणारे हवेत. जनतेची आर्थिक अवस्था खूपच बिकट आहे हे माहित असूनही आयुक्त असे निर्णय कसे  घेऊ शकतात. सरकार गरीब रुग्णांवर उपचार मोफत करू शकत नसेल तर कशाला सरकार चालवताय, असा प्रश्न कांबळे यांनी केला.