शताब्दी महोत्सवी वर्ष : मराठी माणसांनी गेली १०० वर्षे जपलीय वस्त्र भांडारची पंरपरा; दुसरी पिढी सांभाळतेय वारसा

सहयोग वस्त्र भांडारची सुरुवात जुलै १९२१ मध्ये कृष्णाजी विश्वनाथ सहस्त्रबुद्धे यांनी करत पांरपारिक,मराठमोळी, वस्त्रे, लग्न मुंजी धार्मिक विधीसाठी लागणारी वस्त्रे , सुती कुडते, सदरे, पारंपरिक साड्या, धोतर, शेले, पंचे, उपरणे, चादर, बेडशीट आदी कपडे विक्रीच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.

    दत्तात्रेय बाठे, कल्याण :

    कल्याणतील टिळक चौक परिसरात सहयोग वस्त्र भांडार आपला मराठमोळा वस्त्र विक्रीचा व्यवसाय गेली ९९वर्षे पासून करत आहे. आज आषाढी एकादशी दिवशी १००व्या वर्षाकडे वाटचाल करीत मराठी माणसांनी वस्त्र विक्री व्यवसायात दमदार पाऊले टाकली आहेत. सहस्त्रबुद्धे कुटुंबातील भांवडांवर समाजातील सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

    सहयोग वस्त्र भांडारची सुरुवात जुलै १९२१ मध्ये कृष्णाजी विश्वनाथ सहस्त्रबुद्धे यांनी करत पांरपारिक,मराठमोळी, वस्त्रे, लग्न मुंजी धार्मिक विधीसाठी लागणारी वस्त्रे , सुती कुडते, सदरे, पारंपरिक साड्या, धोतर, शेले, पंचे, उपरणे, चादर, बेडशीट आदी कपडे विक्रीच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अरविंद कुष्णाजी सहस्त्रबुद्धे आणि तीन भांवडे सहयोग वस्त्र भांडारचा गाडा हाकत आहेत.

    कोरोना पार्श्वभूमीवर खूप व्यवसायिकांना आपला व्यवसाय डबघाईला आले असल्याने बंद करण्याची वेळ आली असल्याचे दिसत आहे. या काळातही सहस्त्रबुद्धे कुटुंबीयांनी पारंपरिक मराठमोळ्या वस्त्रे विक्रीचा व्यवसाय दमदार पणे सुरू ठेवला आहे. तो फक्त ग्राहकवर्गाशी जोडलेल्या हितगुज, माफक दर, गुणवत्ता, यांचा मेळ साधल्याने शक्य झाल्याचे अरविंद सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

    माझी तिन्ही भावंडे आणि कुटुंबातील सदस्य घेत असलेल्या मेहनतीने आम्ही या वस्त्र विक्री व्यवसायात जम बसविला आहे. स्पर्धेच्या युगात परप्रांतीय व्यवसायिकांच्या गर्दीत मराठी माणसांनी वस्त्र विक्रीत १००वर्षीची वाटचाल करणे निश्चितच कौतुकास्पद आहे. मराठी नव व्यवासियांकासाठी ही निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशी सहस्त्रबुद्धे कुटुंबीयांची कामगिरी असल्याचे यानिमित्ताने नमूद करावे लागेल.