लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी पालघर जिल्ह्यामध्ये ४४ निवारागृहे कार्यरत

पालघर: देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातल्या विस्थापित झालेल्या कामगारांसाठी ४४ निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात ५५२४ कामगार वास्तव्य करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.

पालघर: देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातल्या विस्थापित झालेल्या कामगारांसाठी ४४ निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात ५५२४ कामगार वास्तव्य करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शासनानं लॉकडाऊन घोषीत केल्यामुळे बेघर, विस्थापित, परराज्यातले अडकलेले कामगार यांच्यासाठी मदत केंद्र स्थापन करुन तिथे भोजन आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

पालघर जिल्हयात आजपर्यंत  एकुण ४४ निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. या निवारागृहांमध्ये  ५५२४ कामगार आहेत. या निवारागृहापैंकी ८ निवारागृह ही शासनामार्फत चालविण्यात येत आहेत. त्यात ८५१ मजुर आहेत . तर एक निवारागृह हे सामाजिक संस्थेमार्फत चालविण्यात येत आहे. त्यात १२७ मजूर आहेत. तसेच औद्योगिक आस्थापने मार्फत २८ निवारागृहे चालविण्यात येत असुन त्यात ४२५८ मजूर निवास करत आहेत. तर वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत ७ निवारागृहे चालविण्यात येत आहेत. त्यात २८८ मजूर आहेत .  वसई आणि पालघर तालुक्यात  गरजु व्यक्तींसाठी शिजवलेले अन्न वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी १६ शासकीय कम्युनिटी किचनमधुन तर १० सामाजिक संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या कम्युनिटी किचनमार्फत सरासरी ५५ ते ६०  हजार गरजु व्यक्तींना दिवसातुन दोन वेळा शिजवलेल्या अन्नाचे पाकीट देण्यात येते. वसई तालुक्यात आणि पालघर तालुक्यात सुरु असलेल्या २६ कम्युनिटी किचनची आणि ज्या वाटप केंद्रावरुन ते अन्न पदार्थ वाटप करण्यात येतात त्या ७३ वाटप केंद्राची तपासणी  २४ ते २५ एप्रिल या कालावधीत जिल्हयातल्या विविध अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.