kdmc

कल्याण डोंबिवली मनपामध्ये २७ गावातील ९गावे राहिली असुन या गावाचा मालमत्ता कर आकरणीचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी क.डो.म.पा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची पदाधिकारी समवेत भेट घेत त्यांनी २००२ पर्यंत ची बांधकामांना अड्डीच पट जास्त टॅक्स आकरणी लावली जात आहे. २००२ मध्ये जी मालमत्ता कर आकरणी होती ती लावली गेल्यास मालमत्ता करात नागरिकांना दिलसा मिळेल व ९गावातील नागरिक टॅक्स भरतील जिणेकरुन मनपा तिजोरीत भर पडेल.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आयुक्त यांच्या दालनात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मनपात २७गावातील राहलेली ९गावांच्या मालमत्ता करात दिलासा मिळेल तसेच एमआयडीसी परिसरातील रस्त्यांचा कायापालट होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे सांगितले.

कल्याण डोंबिवली मनपामध्ये २७ गावातील ९गावे राहिली असुन या गावाचा मालमत्ता कर आकरणीचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी क.डो.म.पा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची पदाधिकारी समवेत भेट घेत त्यांनी २००२ पर्यंत ची बांधकामांना अड्डीच पट जास्त टॅक्स आकरणी लावली जात आहे. २००२ मध्ये जी मालमत्ता कर आकरणी होती ती लावली गेल्यास मालमत्ता करात नागरिकांना दिलसा मिळेल व ९गावातील नागरिक टॅक्स भरतील जिणेकरुन मनपा तिजोरीत भर पडेल. तसेच २०१५ ते २००२ पर्यंत बांधकामांना जिल्हा परिषद ,एम् एम् आर् डी ने बांंधकाम परवानगी दिली असेल तर अशा बांधकामाना मालमत्ता करात रिलिफ मिळेल. आयुक्तांनी मान्यता दिली असल्याने आगमी महासभेत मनपात समाविष्ट असलेल्या ९गावाचा मालमत्ता कराचा प्रलंबित विषय घेऊन तो मार्गी लागणार आहे. तसेच डिसेंबर पर्यंत मालमत्ता करांची अभय योजना असल्याने नागरिकांना डब्बल बेनिफट मिळेल.

एम् आय डी सी विभागातील रस्ते झाले नव्हते याबाबत खासदार श्री कांत शिंदे औघिगक मंत्री सुभाष देसाई या़ची भेट घेत व्यथा मांडली भेटीदरम्यान एम् आय् डी सी ने रस्ते मनपाने करावेत याबाबत मनपाला हा भार परवडणार नव्हता या बाबत ५० टक्के एमआयडीसी ५० टक्के मनपा खर्चातुन एमआयडीसी परिसरातील रस्ते एमआयडीसी परिसरातील निवासी रस्ते करण्यात यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला व मार्ग काढण्यात आला या प्रस्तावास आयुक्तांनी मान्यता दिली असल्याने एमआयडीसी परिसरातील ११० कोटीचे रस्ते एमआयडीसीच्या ५० टक्के मनपाच्या ५० टक्के हिस्सा तुन हे रस्ते होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच एमआयडीसी परिसरातील दुरावस्था झालेले रस्ते लवकरच कात टाकणार असे चित्र यानिमित्ताने उभे राहिले आहे.