शिवसेनेची टिटवाळ्यात ऑनलाईन माध्यमातून घरगुती गणपती देखवा स्पर्धा संपन्न

कोविड -१९ च्या परिस्थितीत यावर्षी एकमेकांकडे जाता येत नसल्याची अडचण लक्षात घेऊन अभिनव ऑनलाईन पध्दतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धेसाठी एका विशेष वॉट्सएपगृपची निर्मिती करुन मांडा टिटवाळ्यातील देखाव्यांचे फोटो या गृपवर मागवण्यात आले. ए.बी.पी. माझा च्या माजी ग्राफिक्स कलाकर प्रिया कटके यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले.

कल्याण – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सवानिमित्त टिटवाळ्यात ऑनलाईन माध्यमातून घरगुती गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले होते. शिवसेना मांडा-टिटवाळा शाखेच्या वतीने आमदार विश्वनाथ भोईर व उपशहरप्रमुख किशोर शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सहसचिव अ‍ॅड. जयेश वाणी यांनी घरगुती गणेश देखावा स्पर्धेचं आयोजन केलं होतं. (Ganpati Dekhwa competition online in Titwala)

कोविड -१९ च्या परिस्थितीत यावर्षी एकमेकांकडे जाता येत नसल्याची अडचण लक्षात घेऊन अभिनव ऑनलाईन पध्दतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धेसाठी एका विशेष वॉट्सएपगृपची निर्मिती करुन मांडा टिटवाळ्यातील देखाव्यांचे फोटो या गृपवर मागवण्यात आले. ए.बी.पी. माझा च्या माजी ग्राफिक्स कलाकर प्रिया कटके यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले.

स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्याघरी जाऊन सोशल डिस्टंन्स नियमांचे पालन करुन बक्षिस वितरण रविवारी करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम पुरस्कार रु. ५००१ वैभव शेलावले, द्वितीय पुरस्कार रु. ३००१ मयुरेश गजरे व प्रतीक गुरव यांना विभागुन तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस सुनंदा भांगरे व आकाश खराटे यांना देण्यात आले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी उपविभागप्रमुख रेवनाथ पाटिल, उपशाखा प्रमुख मनिष चव्हाण, युवासैनिक महेश एगडे, अक्षय स्वामी, अनिल राठेड, सिध्देश चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली.