कोरोनाबाधित रूग्णांकडून रिपोर्टसाठी आकारले जातात ३००० रुपये – शिवसैनिकाचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

डोंबिवली : कोरोनाबाधित रुग्णांच्या रिपोर्टसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आता ३००० रुपये शुल्क आकारत आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने हाताला काम मिळत नसल्याने पैसे आणणार तरी कुठून असा प्रश्न रुग्ण

 डोंबिवली : कोरोनाबाधित रुग्णांच्या रिपोर्टसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आता ३००० रुपये शुल्क आकारत आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने हाताला काम मिळत नसल्याने पैसे आणणार तरी कुठून असा प्रश्न रुग्ण आणि नातेवाईकांनी प्रशासनाला विचारला आहे. डोंबिवलीतील पालिकेच्या रुग्णालयात एका पॅथोलाॅजी लॅबमध्ये कोरोनाची तपासणी केली जाते. यावर सत्ताधारी पक्ष मुग गिळून गप्प बसले आहे. मात्र डोंबिवलीतील एका शिवसैनिकाने गरीब रुग्णांसाठी प्रशासनाच्या या अन्यायकारक नियमाविरोधात आवाज उठविला आहे. कोरोना चाचणी रिपोर्टसाठी प्रशासनाने मोफत अथवा अगदी कमी शुल्क आकारावे अशी मागणी शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी केली आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सुरुवातीला अशा रुग्णांवर पालिका प्रशासन मोफत उपचार करत होते तर त्यांच्या रिपोर्टसाठी कोणतेही शुल्क आकारत नव्हते. मात्र आता पालिका प्रशासनाने कोरोना चाचणी रिपोर्टसाठी रुग्णाकडून ३००० रुपये दर आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये सर्वची आर्थिक स्थिती बिकट असताना प्रशासने अश्या प्रकारे दर आकराने अन्यायकारक असल्याची ओरड सुरु झाली आहे. डोंबिवलीतील पालीकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात अशा प्रकारे दर आकरणी होत असल्याने गरीब रुग्ण हैराण झाले आहेत. अश्या गरीब रुग्णांसाठी शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी आवाज उठविला आहे. कोरोना चाचणी रिपोर्टसाठी प्रशासनाने मोफत अथवा अगदी कमी शुल्क आकारावे अशी मागणी शाखाप्रमुख नाईक यांनी केली आहे. प्रशासनाने यावर निर्णय घेतला नाही तर शास्त्रीनगर रूग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला आहे. तर सत्ताधारी गरीब रुग्णांना न्याय देण्यास शांत का बसले असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.