shivsena in evm hacking case

भाजपा आमदार गणपत गायकवाड(MLa Ganpat Gaikwad) यांना ईव्हीएम मशीन हॅक(EVM Machine hacking) करून निवडून आणल्याच्या हॅकरच्या दाव्याला आता राजकीय वळण आले आहे. शिवसेनेने या प्रकरणात उडी घेतली आहे.

    कल्याण : कल्याण(kalyan) पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड(MLa Ganpat Gaikwad) यांना ईव्हीएम मशीन हॅक(EVM Machine hacking) करून निवडून आणल्याच्या हॅकरच्या दाव्याला आता राजकीय वळण आले आहे. शिवसेनेने या प्रकरणात उडी घेत ईव्हीएम मशीनमध्ये मतांच्या फेरफार प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार धनंजय बोडारे यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कल्याण पूर्वसह संपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, नगरसेवक महेश गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    विधानसभेच्या निवडणुकीत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना ईव्हीएम मशीन हॅक करुन निवडणूक जिंकुन दिल्याचा दावा करणाऱ्या एका हॅकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी कल्याण पूर्व विधान सभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी हॅकरने आपल्याला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करीत हॅकर विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात देत याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    हॅकरच्या ईव्हीएम हॅक करून गायकवाड यांना निवडून आल्याच्या दाव्याला आता चांगलेच राजकीय वळण आले असून या ईव्हीएम मशीन मधील मतदान फेरफारीच्या प्रकरणात शिवसेनेने उडी घेतली आहे. या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून भाजपा आमदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार धनंजय बोडोरे व अन्य शिवसेनेच्या पदाधिकार्यानी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी भेट घेत या घटनेची सखोल चॉकशी करून आमदार गायकवाड यांच्या वर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस उपायुक्तांना दिले आहे.