shivsena women letter for skywalk

कल्याण(kalyan) पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा रेल्वेवरील स्कायवॉक(skywalk) हा गर्दुल्ले, चोरटे भिकारी यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे  महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याण : कल्याण(kalyan) पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा रेल्वेवरील स्कायवॉक(skywalk) हा गर्दुल्ले, चोरटे भिकारी यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे  महिला सुरक्षेचा(women safety) प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक विजया अरविंद पोटे व शिष्टमंडळातील शिवसेनेच्या रगरागिणी यांनी पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन यांना महिला सुरक्षेतेबाबत उपाययोजनाची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

महिला सुरक्षा प्रश्नाबाबत प्रभावी अमंलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील निवेदनाद्वारे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. कल्याण पश्चिम स्टेशन परिसर व स्कायवॉक वर दिवसेंदिवस महिलावर होणारे अत्याचार वाढत आहेत. नागरिकांना व प्रवाशांना प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसर व बस स्थानकावर प्रवास करण्यासाठी एमआरडीए व कल्याण डोंबिवली पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्काय वॉक बांधण्यात आला.

या स्काय वॉकमुळे स्टेशन परिसर व बस स्थानकमध्ये त्वरित प्रवास करता यावा हाच उद्दात हेतु ग्राह्य धरून या स्काय वॉक कोट्यावधी रूपये खर्च करून बांधण्यात आला. या स्काय वॉकमुळे महिलांचा प्रवास सुरक्षित व सुखद होण्याऐवजी या स्काय वॉकवर महिलांवर होणारे अत्याचार वाढू लागले. या स्काय वॉकवर गर्दुल्ले, भुरटे चोर, भिकारी व फेरीवाले यांचेच साम्राज्य असल्यामुळे महिलांना या ठिकाणी प्रवास करताना असंख्य अडचणींना तोंड घावे लागते.

स्काय वॉकवर मद्य प्राशन करून अंदाधुंदपणे वागणारे मद्यपी महिलांची राजरोसपणे छेडछाड करतात. महिलांना बघुन अश्लील हावभाव करतात. यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच स्काय वॉक स्टेशन परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे सर्वसामान्य महिलांना अशा परिसरातून प्रवास करताना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते.

वात्रट लोक सर्वसामान्य महिलांकडे त्या नजरेने पाहतात. या परिसरात भामटे चोर, साखळी चोरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे महिलांना या परिसरात जाता येताना आपला जीव धोक्यात घालुनच प्रवास करावा लागतो. तरी प्रशसनाकडुन त्वरित उपाययोजना करून प्रशासकीय पातळीवर महिलांंच्या सुरक्षितेच्या उपाययोजना कराव्यात,अशी मागणी पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे शिवसेना कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे शिवसेना,महिला आघाडी शिष्टमंडळाने केली आहे.

रेल्वे प्रशासन व कल्याण परिमंडळ ३चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांना निवेदन देते प्रसंगी शिवसेना महिला पदाधिकारी विजया पोटे, छाया वाघमारे, सुशिला माळी, शितल मंढारी, रेखा पाटील, राधिका गुप्ते ,आदींसह शिवसेना महीला आघाडीच्या महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी परिमंडळ ३चे उपआयुक्त विवेक पानसरे यांनी स्काय वॉकवर पोलीस सुरक्षा नेमण्यात आली असुन मनपाला देखील सुरक्षारक्षक स्काय वॉकवर वाढविण्याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले.