dombivali shivsena protest

डोंबिवली : उत्तर प्रदेश हे ‘रामराज्य’ नसून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ‘जंगल राज’ आहे. योगी सरकारमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार सुरू झाले आहेत. राज्यात बलात्कार आणि मुलींच्या हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हाथरस येथे ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार(hathras gangrape) करून तिला मारण्यात आले. कुटुंबाच्या परवानगीशिवाय रात्रीच्या अंधारात पोलिसांनी मृतदेहावर अत्यसंस्कार केले. या घटनेचे निषेध आंदोलन (protest)डोंबिवली(dombivali) शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वात डोंबिवली केले.

शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मानपाडा रस्त्यावर महिला शिवसैनिकांनी योगी सरकार विरोधात घोषणा दिल्या. यावेळी कल्याण उप-जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी घटनेबाबत निषेध नोंदवून सरकारच्या नाकर्तेपणाच्या विविध गोष्टी सांगून भाजपा सरकारवर ताशेरे ओढले. तर महिला पदाधिकारी वैशाली दरेकर-राणे म्हणाल्या एका ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. तिची जीभ छाटली, तिच्या मानेचे हाड मोडल असं असतांना तिच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन न करता उत्तरप्रदेश सरकारने हे पूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायला हवा होता. पण हे सर्व प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न युपी सरकार करीत आहे. हे प्रकरण मिडिया समोर येऊ नये म्हणून मिडियालाही घटनेबाबत माहिती देण्यास पोलिसांकडून मज्जाव केला. अशा जंगलराज सरकारचा आम्ही निषेध करतो.

यावेळी पदाधिकारी तात्यासाहेब माने, विवेक खांबकर, किशोर मानकामे, संतोष चव्हाण, संजय पावशे, राहुल म्हात्रे, संजय मांजरेकर, सतीश मोडक, किरण मोंडकर, ममता घाडीगावकर, सारिका चव्हाण यांच्यासह शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाली होते.