bharat band in kalyan

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची(bharat band) हाक दिली होती. कल्याणमध्ये (kalyan)या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. कल्याण पूर्व भागात चक्की नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कायद्याचा विरोध करत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कल्याण : कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची(bharat band) हाक दिली होती. कल्याणमध्ये (kalyan)या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. कल्याण पूर्व भागात चक्की नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कायद्याचा विरोध करत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

bharat band arrest in kalyan

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चक्कीनाका येथे जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन आणि वक्ता सेलचे मनोज नायर यांच्या पुढाकाराने निदर्शने करण्यात आली. माझा शेतकरी माझा पाठींबा, हम खलिस्तान नही मांग रहे है, हम इस देश को अंबानीस्तान, और अडानीस्तान बननेसे बचा रहे है, अशा आशयाचे फलक हातात घेऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरात सुरू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. जगन्नाथ शिंदे यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करत केंद्र सरकारने गनिमी काव्याने अन्यायकारक कायदा शेतकऱ्यावर लादला आहे. शेतकऱ्याना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असलेले कायदे रद्द करावे,अशी मागणी केली आहे.

शिवसेनेचा सहभाग
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदच्या आवाहनाला कल्याण पूर्वेत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना कल्याण पूर्वच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती.

कल्याण पूर्व विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा माजी नगरसेवक शरद पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेसमोर निदर्शने करत दुकाने सुरु असलेल्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला व्यापाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद देत दुकाने बंद केली.

kalyan shivsena in bharat band

कल्याण पूर्वेत सकाळी ९ वाजेपासून रिक्षा बंद झाल्या आहेत. दुकानदारांनी देखील स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केली आहेत. शिवसेनेने ११ ते ३ बंद करण्याचे आवाहन केले होते. त्याला जनतेनेसुद्धा चांगला प्रतिसाद दिला असून केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्याला जनता देखील विरोध करत आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने आम्ही त्याचा विरोध करत असल्याची प्रतिक्रिया कल्याण पूर्व विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख शरद पाटील यांनी दिली.

बाईक रॅलीच्या माध्यमातून युवक काँग्रेसची निदर्शने

केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटत असतांना कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली काढून केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच जी दुकाने सुरु होती त्या दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

bike rally

कल्याण डोंबिवली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष देसले यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवली येथे शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा विरोध करून शेतकऱ्यांना समर्थन देण्यात आले. बाइक रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेस चे राज्य सचिव गायत्री जय सेन, जसकरन सिंह, फिरोज शेख, स्वप्निल सिंह, जाफर खातीक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डोंबिवलीत युवक काँग्रेसचा शेतकरी बंदला पाठिंबा

नवा कृषी कायदा रद्द करावा म्हणून देशभरात मंगळवारी बंद पुकारण्यात आला डोंबिवलीतील बंदला प्रतिसाद मिळाला असून डोंबिवली विधानसभा युवक काँगेसने बंदला पाठिंबा दिला. यावेळी डोंबिवली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पमेश म्हात्रे यांसह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे, डोंबिवली शहर ( प ) ब्लॉक माजी कार्याध्यक्ष एकनाथ म्हात्रे, निशिकांत रानडे, अभय तावरे,निवृत्ती जोशी,प्रणव केणे,राजू सोनी,संजय पाटील,राकेश वायंगणकर यांनी बंदला पाठिंबा दर्शविला. यावेळी पमेश म्हात्रे म्हणाले,केंद्र सरकारचा हा नवा कायदा शेतकरी वर्गाला मान्य नाही. भारत हा देश कृषिप्रधान असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर काँग्रेस गप्प बसणार नाही.काँग्रेसने नेहमी शेतकऱ्यांचे हित पाहिले आहे.