युवकाने महिलेला कोव्हिड अतिसंवेदनशील धारावी भागातून सोडले आंबिवली येथे, गुन्हा दाखल करत केले क्वारंटाईन

कल्याण :- भारतात कोरोना साथीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून ३ मे पर्यन्त राज्यात सर्वत्र संचारबंदी जाहीर केलेली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक

 कल्याण :-   भारतात कोरोना साथीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून ३ मे पर्यन्त राज्यात सर्वत्र संचारबंदी जाहीर केलेली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीस वाहनांने प्रवास करण्यात मनाई करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी देखील कोरोना कंटेंनमेंट झोनमधील नागरिक इतर भागात गेल्याचे आढळून आल्यास त्यांना महापालिकेच्या क्‍वारंटाईन कक्षात दाखल करून १४ दिवस ठेवणेबाबत निर्देश दिलेलें आहेत, असे असतानाही डोंबिवली येथे राहणाऱ्या आणि धारावी येथे काम करणाऱ्या एका इसमाने धारावीसारख्या कोव्हिड अतिसंवेदनशील भागातून एका महिलेला दुचाकीवरून अटाळी-आंबिवली येथे आणून सोडले. 

सदर इसमाने कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न करता धारावी- मुंबई ते अटाळी-आंबिवली असा प्रवास करून संचारबंदीचे उल्लंघन केल्याने सदर दोन्ही व्यक्ती विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या अनुषंगाने भंग केल्यामुळे कोव्हिडं-१९  उपाययोजना २०२० नियम ११ नुसार भारतीय दंड संहिता (५४ ऑफ १८६०) कलम १८८,२६९,२७०  व साथरोग प्रतिबंधक कायदा १९९७ चे कलम २,३ व ४ अन्वये खडकपाडा पोलीस स्टेशन , कल्याण(प)  येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदर इसमास व महिलेस टाटा आमंत्रा येथे क्‍वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे.