liquar shop

दुकान उघडे ठेवल्याबद्दल ५ हजार दंड तसेच दुकानदाराने मास्क न लावल्याने पाचशे रू दंड असे पावती देणार असल्याचे सांगत दुकानबंद करण्यास भाग पाडले. मात्र मनपा कारवाई पथकाची गाडी तेथुन पुढे गेल्यानंतर दुकान दाराने पुन्हा तळीराम ग्राहकांना मद्य विक्री करणे सुरू केल्याचे दिसत होते.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात मिशेन बिगेन अतंर्गत शिथिलता देत सायंकाळी ७ पर्यंत दुकाने ( shop) उघडी ठेवण्यास परवानगी दिली असली तरी काही दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर ( violates rule ) बसवत दुकाने उघडी ठेवत आपल्या दुकानासमोर ग्राहकांची गर्दी करीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत असल्याचे चित्र दिसत आहे.

कल्याण पश्चिमेतील मिलिंद नगर कॉर्नर समोरील बिर्ला कॉलेज रोड रस्त्यादरम्यान असलेले वाईनशॉप शुक्रवारी संध्याकाळी ७ नंतरही खुलेआम सुरू होते. दुकाना बाहेर देशी विदेशी मद्य घेण्यासाठी तोबा गर्दी करीत जोरात खरेदी सुरू होती. मनपाचे भरारी पथकाने तिथे येत मद्य खरेदी करणाऱ्या तळीरामाच्या गर्दी सह दुकानचा फोटो घेत दुकानदारास दुकान बंद करण्यास सांगितले. व दुकान उघडे ठेवल्याबद्दल ५ हजार दंड तसेच दुकानदाराने मास्क न लावल्याने पाचशे रू दंड असे पावती देणार असल्याचे सांगत दुकानबंद करण्यास भाग पाडले. मात्र मनपा कारवाई (repeated action) पथकाची गाडी तेथुन पुढे गेल्यानंतर दुकान दाराने पुन्हा तळीराम ग्राहकांना मद्य विक्री करणे सुरू केल्याचे दिसत होते.

यामुळे कारवाई चा बडगा उचलुन देखील दुकानदार ऐकत नसेल तर प्रशासन अशा दुकानदारावर कसा अंकुश ठेवणार असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच कल्याण पश्चिमेत चायनीज कॉर्नर व धाबेवाले देखील रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासन प्रभावी लढा देत उपाययोजना करीत प्रार्दुभाव कसा कमी होईल याकडे दक्षता घेत आहे. पंरतु सोशल डिस्टन्सिंगचे नियम तसेच मिशेन बिगेन अगेन नियमवलीचे पालन न करणार्या दुकानदारांना प्रशासन कसा चाप लावणार हे पाहावे लागेल.

दरम्यान याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला असता, वारंवार कारवाई करून देखील दुकानदार जर दुकाने सुरू ठेवत असतील तर ते दुकान सील करण्यात येऊन नियमभंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे सांगितले.