निसर्ग चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी वसई, पालघर, डहाणू तालुक्यातले उद्योग, दुकाने बंद – जिल्हाधिकारी

पालघर : भारतीय हवामान खात्यान दिलेल्या इशाऱ्यानुसार निसर्ग चक्रीवादळामुळे ३ जूनला पालघर जिल्हयातल्या समुद्रकिनारी असलेल्या वसई, पालघर, डहाणू तालुक्यातले सर्व उद्योग, उद्योग आस्थापना, सर्व

 पालघर : भारतीय हवामान खात्यान दिलेल्या इशाऱ्यानुसार निसर्ग चक्रीवादळामुळे ३ जूनला पालघर जिल्हयातल्या समुद्रकिनारी असलेल्या वसई, पालघर, डहाणू तालुक्यातले सर्व उद्योग, उद्योग आस्थापना, सर्व दुकाने, खाजगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.

या चक्रीवादळामुळे वसई, पालघर, डहाणू तालुक्यात  हानी होण्याची शक्यता असून अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीचा  विचार करता पालघर जिल्हयातल्या वसई, पालघर, डहाणू तालुक्याच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांची सुरक्षा अबाधित रहावी आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी तसेच आर्थिक हानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. चक्रीवादळाच्या अनुषंगाने औद्योगिक आस्थापनांनी कारखान्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून सेफ शटडाऊन बाबत योग्य ती दक्षता घ्यावी. त्यातून कोणतं ही रसायन अथवा वायु यांचे उत्सर्जन होणार नाही याची खबरदारी घ्यावी. या कालावधीत  पालघर , वसई आणि डहाणू या ३  तालुक्यातली अत्यावश्यक सेवा आणि दुकाने चालू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे