आदिवासींना रेशनिंग कार्ड मिळावे या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने घेतला अन्न सत्याग्रह आंदोलनाचा पवित्रा

मुरबाड: शिधापत्रिका नसणाऱ्या आदिवासी कुटुंबांना तात्काळ शिधापत्रिका देण्यात याव्यात, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन सुरूच असून आता या आंदोलनाने अन्नसत्याग्रहाचा पवित्रा घेतला आहे. सध्या

 मुरबाड: शिधापत्रिका नसणाऱ्या आदिवासी कुटुंबांना तात्काळ शिधापत्रिका देण्यात याव्यात, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन सुरूच असून आता या आंदोलनाने अन्नसत्याग्रहाचा पवित्रा घेतला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रोजगार नाही. तसेच ग्रामीण भागातील उद्योगधंदेही बंद असल्याने येथील आदिवासी कुटुंबांची मोठ्या प्रमाणात उपासमार सुरू आहे.रेशनवरील धान्य हे ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांनाच मिळत आहे.मात्र शिधापत्रिका नसलेली तालुक्यात शेकडो कुटुंबे आहेत. शिधापत्रिका नव्याने काढण्यासाठी लॉकडाऊनमुळे कागदपत्रांचीही अडचण येत असल्याने शिधापत्रिका नसलेल्या आदिवासींची परवड सुरू आहे.त्यात शासनाची रोजगार हमी योजनेची कामेही कुठे सुरू नसल्याने या वर्गाचे अतोनात हाल सुरू असल्याने आदिवासींनी मुरबाड कल्याण महामार्गालगत अन्नसत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनकर्ते पायी चालत जाऊन मंत्रालयावर धडकतील असे दिनेश जाधव यांनी सांगितले. मुरबाड तालुक्यात या आदिवासींची अवघी अडीचशे रेशनिंग कार्ड बनवायची आहेत. मात्र ते ही स्थानिक प्रशासनाकडून होत नसल्याने आदिवासी तहसीलदार कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करीत आहेत. रेशनिंगचा इष्टांक नसल्याचे कारण सध्या मुरबाड तहसीलदार प्रशासन या आदिवासींना देत आहे.