भिवंडीत श्रमजीवी संघटनेचे आंदोलन सुरुच

भिवंडी: कातकरी, कष्टकरी आदिवासींना रेशनकार्ड व रोजगार हमी योजनेवर काम मिळावे या मागणीसाठी अत्यंत अनोख्या पद्धतीनें भिंवडी तहसिल कार्यालयासमोर पन्नास आदिवासीं सहभागाने हक्कग्रह आंदोलन केले.

 भिवंडी: कातकरी, कष्टकरी आदिवासींना रेशनकार्ड व रोजगार हमी योजनेवर काम मिळावे या मागणीसाठी अत्यंत अनोख्या पद्धतीनें भिंवडी तहसिल कार्यालयासमोर पन्नास आदिवासीं सहभागाने हक्कग्रह आंदोलन केले. यावेळी शारीरीक अंतर पाळून तोंडाळा मास्क, हाताला सॅनिटायझर लावुन शिस्तबद्धपणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी  निवासी नायब तहसीलदार गोरख फडतरे यांना निवेदन देत सरकारकडे केलेल्या मागण्यांचा पाढा श्रमजीवी कामगार संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष अॅड रोहीदास पाटील यांनी निवासी नायब तहसिलदार आणि नायब तहसिलदार महेश चौधरी यांच्या समोर वाचून आदिवासींच्या व्यथा मांडल्या. श्रमजीवी संघटनेने आपल्या परिने प्रयत्न करत लोकांना मदत केली. माञ संघटनेच्या मदतीला मर्यादा असल्याने हे काम सरकारने करायला हवे. यासाठी सरकार शासन यांच्याशी संघटनेने पत्रव्यवहार केला. संघटनेने संस्थापक विवेक पंडित यांनी जनहित याचिका दाखल करत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले .त्यात न्यायालयाने हमीपत्र सादर करण्यास सांगितले. सरकारने दाखल केलेल्या हमीपत्रामध्ये तातडीने रेशनकार्ड आणि धान्यासह इतर जीवनावश्यक देण्याचे मान्य केले. मात्र अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. ती अमंलबजावणी करावी याकरीता संघटनेने हक्कग्रह आंदोलन सुरूच ठेवलेले आहे.अठरा हजार ६९८ रेशनकार्डचे अर्ज भरले,मिळाले मात्र ११४८,भिवंडीत २१९३ अर्ज भरले त्यामधील तीनशे रेशनकार्ड मिळाले आहेत.

या आंदोलनात महिला ठिणगीच्या जिल्हाध्यक्ष जयाताई पारधी,  श्रमजीवी संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष सुनिल लोने, शहर तालुका अध्यक्ष सागर देसक,  श्रमजीवी कामगार संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष अॅड रोहीदास पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष केशव पारधी, शहरसचिव मोतीराम नामकुडा, तालुका संघटक यशवंत भोईर, श्रमजीवी संघटना तालुका युवक सचिव ललित शेलके,लक्ष्मी मुकने,कविता कदम, हेदर कासट, उपाध्यक्ष बाळाराम मागांत,किशोर हूमने आदी पदाधिकारी सहभागी झाले होते, 
 
संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, श्रमजीवी यूवक जिल्हाप्रमूख प्रमोद पवार यांनी हक्कग्रह आंदोलनास भेट दिली,
 
 यावेळी निवासि नायब तहसिलदार गोरख फडतरे यांना श्रमजीवी कामगार संघटनेचे भिवंडी तालूका अध्यक्ष अॅड रोहीदास पाटील, श्रमजीवी यूवक भिवंडी तालूका सचिव ललित शेलके तालूका संघटक यशवंत भोईर,हेदर कासट यांनी मागण्याच निवेदन दिले,
 
संध्याकाळी पाच वाजता पूरवठनिरिक्षक प्रकाश पाटील यांनी चालीस रेशन कार्ड दिले,त्याच कातकरी सभासदांना वाटप करण्यात आले,