shramjivi protest

लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतर अनलॉकच्या संपूर्ण काळामध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यात उपासमारीचे जिणे जगणाऱ्या आदिवासींसाठी कुठलाही खर्च न करता त्यांना जगविण्याबाबत उदासीनता दाखवली शिवाय या विभागाच्या वतीने आदिवासींच्या भुकेकडे व शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्याने श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे .

भिवंडी: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात आदिवासींच्या हाताचे मोलमजुरीचे काम गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासींना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची मदत खावटी कर्जाच्या माध्यमातून मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेने वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन करूनही ती मदत करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने श्रमजीवी संघटनेच्या(shramjivi organization) वतीने भिवंडी तहसीलदार कार्यालयात आदिवासी विकास महामंडळाचे तेरावे आंदोलन(protest) घालण्यात आले.

श्रमजीवी संघटनेचे युवक ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या याआंदोलनात संगीता भोमटे, मोतीराम नामखुडा,आशा भोईर,गुरुनाथ वाघे,मुकेश भांगरे यांसह असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी डोक्याचे मुंडन करून पिंडावर पाणी सोडून हे अभिनव आंदोलन केले व त्यानंतर तहसीलदार कार्यालयात निवेदन देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतर अनलॉकच्या संपूर्ण काळामध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यात उपासमारीचे जिणे जगणाऱ्या आदिवासींसाठी कुठलाही खर्च न करता त्यांना जगविण्याबाबत उदासीनता दाखवली शिवाय या विभागाच्या वतीने आदिवासींच्या भुकेकडे व शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्याने श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . या आंदोलनानंतर तहसीलदार यांच्या अनुपस्थित नायब तहसीलदार महेश चौधरी यांच्याकडे  निवेदन सादर करण्यात आले.