कोरोना योद्ध्यांचे कौतुक करत खा. श्रीकांत शिंदे यांनी केली त्यांना मदत

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील पोलीस स्थानकांत उपस्थित राहून कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शासन निर्णय काटेकोरपणे पाळले जावेत

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील पोलीस स्थानकांत उपस्थित राहून कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शासन निर्णय काटेकोरपणे पाळले जावेत व त्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणे यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसांठी आपल्या जिवाची पर्वा न करता गेले अनेक दिवस अहोरात्र सेवा देणाऱ्या दक्ष पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांच्या कर्तव्य आणि निष्ठेबाबत त्यांचे मनापासून कौतुक करून त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता पोलीस बांधवांच्या संरक्षणासाठी पीपीई किट तसेच अन्नधान्याचे वाटप खा.डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले. तसेच अहोरात्र जीवाची पर्वा व करणारे, सेवा देणाऱ्या पोलिसांचे खासदार शिंदे यांनी कौतुक केले. याप्रसंगी अंबरनाथ विधानसभा आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख, नगरसेवक राजेश मोरे, कल्याण पूर्व विधानसभा संघटक शरद पाटील उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.