जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक

भिवंडी : भिवंडी शहरातील जैतुनपुरा एकता हॉटेलजवळ कासीम शेख यांच्या खोलीत जुगार खेळत असलेल्या सहाजणांना शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार समदनगर

 भिवंडी : भिवंडी शहरातील जैतुनपुरा एकता हॉटेलजवळ कासीम शेख यांच्या खोलीत जुगार खेळत असलेल्या सहाजणांना शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.  पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार समदनगर भागात अब्बास चाळ मधील कासीम शेखच्या खोलीत  पोलिसांनी धाड घातली असता  तेथे जुगार सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या अखिल अन्सारी,मुन्शी शेख, समीर शेख ,मोहमद अली शेख,सगीर हकीम, कासीम शेख या सहा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.