वाडा तालुक्यात आज १६ कोरोना रुग्णांची नोंद

वाडा : वाडा तालुक्यात पुन्हा १८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून यातील तालुक्यातील पोशेरी येथील कोव्हिड सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींचे आज सकाळी रिपोर्ट आले आहेत. यात तालुक्यातील

वाडा : वाडा तालुक्यात पुन्हा १६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून यातील तालुक्यातील पोशेरी येथील कोव्हिड सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींचे आज सकाळी रिपोर्ट आले आहेत. यात भावेघर येथील १३ आणि ३ रूग्ण हे वाडा येथील आहेत. तसेच विक्रमगड तालुक्यातील इंदगाव आणि कशिवली येथील  २ रुग्णही कोरोना पॉझिटीव्ह आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बुरपले यांनी दिली.

वाडा तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. या अगोदरच वाडा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असताना  यात आज सकाळी नव्या १६ रुग्णांची भर पडली आहे. वाडा तालुक्यातील मोहट्याचा पाडा, चिचघर पाडा , भावेघर, खरीवली,या ठिकाणी कोरोना रूग्ण आढलले आहेत. त्यामुळे ती गावे, गावपाडे कंटेनमेंट झोन जाहीर केली आहेत. यातच आज कोव्हिड सेंटर असलेल्या  इथल्या १६ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  वाडा तालुक्यातील पोशेरी इथल्या आयडियल कॉलेज ठिकाणी डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर हॉस्पिटल आणि कोव्हीड केअर सेंटर हे हॉस्टेलमध्ये सुरू करण्यात आले आहे. तसेच विक्रमगड तालुक्यात २ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.