भिवंडीत एकाच दिवशी ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर १६ नव्या रुग्णांची नोंद

भिवंडी: भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल सात नवे रुग्ण आढळले असून या सात रुग्णांपैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण

 भिवंडी:  भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल सात नवे रुग्ण आढळले असून या सात रुग्णांपैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात ९ नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण व शहरात १६ नवे रुग्ण आढळले आहेत. या १६ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३९० वर पोहचला आहे. 

भिवंडी शहरातील सात नव्या रुग्णांपैकी कासमीपुरा, अंजुरफाटा , दांडेकरवाडी येथे तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून धामणकर नाका येथील ४९ वर्षीय महिलेचा सायनरुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पिराणीपाडा येथील ६५ वर्षीय महिलेचा भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तसेच बिलालनगर शांतीनगर परिसरातील ७४ वर्षीय वृद्धाचा देखील आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला तर नवीताडाळी परिसरातील ३६ तरुणाचा देखील आयजीएम रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान आज आढळलेल्या ७ नव्या रुग्णांमुळे शहरातील बाधित रुग्णांचा आकडा २४१ वर पोहचला आहे. तर १७ रुग्णांचा मृत्यू झालेला असून 96 रुग्ण बरे झाले असून १२८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागातदेखील आज ९ नवे रुग्ण आढळले असून या ९ नव्या रुग्णांपैकी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत पाच , दिवा अंजुर एक  , पडघा दोन तर अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत एक नवा रुग्ण आढळला आहे. दरम्यान ग्रामीण भागातील या ९ नव्या रुग्णामुळे ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १४९ वर पोहचला असून त्यापैकी ६२ रुग्ण बरे झाले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.  भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा आता ३९० वर पोहचला असून त्यापैकी १५८  रुग्ण बरे झाले आहेत तर २० रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या २१२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.