कल्याण डोंबिवलीत ६७ नवीन रुग्ण – दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ६७ नवीन रुग्णांची भर पडली असून दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजच्या या ६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील

  कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ६७ नवीन रुग्णांची भर पडली असून  दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  आजच्या या ६७  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १४९० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला असून ८१९  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६२९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ११, कल्याण पश्चिमेतील ११, डोंबिवली पूर्वेतील २०,  डोंबिवली पश्चिमेतील १५, आंबिवलीतील ३ तर टिटवाळा येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये  ३१ पुरुष, २९ महिला, २ मुलं तर ५ मुली आहेत. आजच्या या रुग्णांमध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये कल्याण पूर्वेतील गवळी नगर विजय नगर येथील ३९ वर्षीय पुरुषाचा आणि डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.  आतापर्यंतच्या १४९० रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ४६६, कल्याण पश्चिमेतील २९६, डोंबिवली पूर्वेतील ३३७, डोंबिवली पश्चिमेतील २५४, मांडा टिटवाळातील ९१, मोहने येथील ३९ आणि पिसवली येथील ७ रुग्ण आहेत.

आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील पाईप लाईन रोड पिसवली, नांदिवली, शिवाजी नगर पिसवली, एम.आय.डी.सी. रोड, गावदेवी रोड, गावदेवी मंदीर, अयोध्या नगरी, कल्याण पश्चिमेतील उंबर्डे रोड, उंबर्डे गाव, रौनक सिटी, सुभाष चौक, जोशीबाग, रामबाग, डोंबिवली पूर्वेतील इंदिरा नगर, आजदे गाव, सोनारपाडा, इंदिरानगर, सागाव, केळकर रोड, तुकाराम नगर, गांधी नगर, आयरे रोड,  टिळक नगर, मानपाडा रोड, डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव, जुनी डोंबिवली, आंबिवली पश्चिमेतील नारायण मंदिराजवळ, मोहने येथील राहुल कोट यांच्या ऑफिसजवळ, टिटवाळा येथील काशिनाथ तरे नगर, सुमुख सोसायटी रोड मांडा, वासुन्द्री रोड, टिटवाळा आरोग्य केंद्र आदी परिसरातील आहेत.