kalyan slab collapsed

कल्याण (kalyan)पश्चिमेकडील स्टेशन नजीक असलेल्या आर्चीस अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर राहणारे जावडेकर यांच्या राहत्या घरातील बेडरूम, हॉल मधील स्लॅब जीर्ण झाले आहेत. स्लॅबमधील लोखंडी सळ्याना गंज लागल्याने जीर्ण झाल्याने स्लॅबचे प्लॅस्टर(Slab Plaster) निघाल्याने केवळ लोखंडी सांगाडा उरला असल्याने स्लॅब धोकादायक बनलेला आहे.

    कल्याण : कल्याणमधील(Kalyan) आर्चीस अपार्टमेंट इमारतीच्या घराचे स्लॅब प्लास्टर व हॉलमधील सिलिंग कोसळले(Slab And Ceiling Collapsed) आहे. तसेच हॉलमध्ये बसलेल्या घर मालक व त्यांच्या मुलाच्या अंगावर सिलिंगची पीओपी शीट कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत घरातील सामान शिफ्ट करून तूर्तास दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले.

    कल्याण पश्चिमेकडील स्टेशन नजीक असलेल्या आर्चीस अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर राहणारे जावडेकर यांच्या राहत्या घरातील बेडरूम, हॉल मधील स्लॅब जीर्ण झाले आहेत. स्लॅबमधील लोखंडी सळ्याना गंज लागल्याने जीर्ण झाल्याने स्लॅबचे प्लॅस्टर निघाल्याने केवळ लोखंडी सांगाडा उरला असल्याने स्लॅब धोकादायक बनलेला आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमाराला जावडेकर यांच्या घरातील हॉलच्या सिलिंगचा स्लॅब अचानकपणे कोसळला. तसेच हॉलमधील सिलिंगला लावलेली पीओपीची शीट हॉलमध्ये बसलेलले मकरंद जावडेकर व त्याच्या मुलाच्या अंगावर कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.

    या घटने प्रकरणी त्वरित पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती कळवताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जावडेकर यांच्या घरातील किचन, हॉल व बेडरूमच्या सिलिंगची पाहणी केली असता त्यांना सर्वच सिलिंग धोकादायक असल्याचे दिसून आले. सिलिंगचे प्लॅस्टर ही निघाले असून लोखंडी सळ्या गंजलेल्या व प्लॅस्टर फुगलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने अन्य स्लॅब कधीही कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे घरात राहणे धोकादायक असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी जावडेकर यांच्या कुटुंबियांना अन्य ठिकाणी शिफ्ट होण्यास सांगितल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली.