उल्हासनगरमध्ये Sai Shakti Buildingचा स्लॅब कोसळला; पाच जण मृत्यूमुखी, काहीजण मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता

उल्हासनगर कॅम्प नंबर २ नेहरू चौक येथील बडोदा बँकेसमोर साई शक्ती ही पाच मजली इमारत आहे. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तळ मजल्यापर्यंत कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगर मधील मोहिनी पॅलेस या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा कॅम्प नंबर २ येथील साई शक्ती या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

    उल्हासनगर कॅम्प नंबर २ नेहरू चौक येथील बडोदा बँकेसमोर साई शक्ती ही पाच मजली इमारत आहे. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तळ मजल्यापर्यंत कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे अधिकारी व कर्मचारी, पालिका अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह आमदार कुमार आयलानी, नगरसेवक राजेश वाधारिया, डॉ. प्रकाश नाथानी यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले.

    या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून रात्री उशिरापर्यंत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. काही जण मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच घटनास्थळी ठाणे महापालिकेची TDRF टीम देखील बोलविण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मलबा काढण्याचे काम सुरु होते.

    Slab of Sai Shakti building collapses in Ulhasnagar 5 killed some trapped under rubble