कल्याणच्या सर्पमित्राने ५ सापांना दिले जीवदान, वनपालांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडणार

कल्याण : कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्याने नाईलाजाने माणसे घरातच राहत असुन प्राण्यांचा वावर मात्र शहरी भागात वाढल्याचे दिसत आहे. कल्याण पश्चिम परिसरातुन दोन

 कल्याण : कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्याने नाईलाजाने माणसे घरातच राहत असुन प्राण्यांचा वावर मात्र शहरी भागात वाढल्याचे दिसत आहे. कल्याण पश्चिम परिसरातुन दोन दिवसांत ५ सापांना पकडून सर्पमित्राने जीवनदान दिले आहे. आधारवाडी परिसरातील गायकर गोठ्याजवळ साडेचार फुटी लांब एक घोणस, चार फुटी लांब एक घोणस अशा दोन विषारी प्रजातीतील दोन सापांना सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी आज सकाळी पकडुन जीवनदान दिले.  तसेच शुक्रवारी भवानी चौक येथील लाकडाच्या वखारीतील कार्यालयात ४ फुटी लांब विषारी नागाला तसेच मुरबाड रोडवरील एका पंपहाऊस लगत तब्बल ७ फुटी लांब धामण ,गोदरेज हिल परिसरातुन शुक्रवारी साडे पाच फुटी लांब नागिणीला पकडून सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी जीवनदान दिले.

दोन दिवसात  नागरी वस्तीमध्ये ५ साप आढळल्याने आता सापांचा वावर नागरी वस्तीमध्ये वाढल्याचे दिसत आहे. गोदरेज हिल परिसरातुन साडे पाच फुटी नागिणीने आज सकाळी अठरा अंडी दिल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले. ही अंडी सुरक्षित असुन अंडी वनपाल एम्. डी.जाधव यांच्याकडे सुर्पुद करण्यात आली असुन पाचही सापांना वनपाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले.