राष्ट्रवादीच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रम

विद्यार्थीकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांचा पुढाकार कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस कल्याण डोंबिवली

विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांचा पुढाकार  
 
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांना मोफत सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या आणि अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.  
 
लॉकडाऊन काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने गरजूंना रोज अन्नदान करण्यात येत होते. आता पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत पवार फाऊंडेशन आणि आमदार अप्पा शिंदे यांच्या सहकार्याने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मास्क, सॅनिटायझर, रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप सुरु केले आहे. नागरिकांसोबतच कोरोनाच्या काळात अविरत काम करणाऱ्या पालिका कर्मचारी आणि पत्रकारांना देखील सॅनिटायझरचे वाटप यावेळी करण्यात आले. ९ जून पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली असून १५ जून पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी दिली.