गणेशोत्सवातून जपली सामाजिक बांधिलकी

सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्याकडे पाच दिवसीय घरगुती गणेशोत्सव काळात गणेश भक्तांकडून जमा झालेले शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे कार्य मागील पाच वर्षांपासुन सुरू आहे. परंतु यंदा कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे गणेश भक्तांवरच निर्बंध आल्यामुळे गणपतीचे मखरच शैक्षणिक साहित्याने करण्यात आली.

कल्याण : “गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी” या उपक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्याकडे पाच दिवसीय घरगुती गणेशोत्सव काळात गणेश भक्तांकडून जमा झालेले शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे कार्य मागील पाच वर्षांपासुन सुरू आहे. परंतु यंदा कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे गणेश भक्तांवरच निर्बंध आल्यामुळे गणपतीचे मखरच शैक्षणिक साहित्याने करण्यात आली.

गणपती विसर्जनानंतर मखर सजावटीचे साहित्य शनिवारी भालिवडी जांभूळवाडी (ता-कर्जत,जि-रायगड) येथील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रेमी ॲड् शशिकांत पाटील, प्रेमनाथ पाटील, विजय पाटील, दिलिप वझे, निलेश म्हात्रे, मंगेश खुटारकर, मधुकर माळी, शिवाजी माळी उपस्थित होते.