पालघर जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विशेष डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर वाडयात

वाडा - कोरोना योध्यातील डॉक्टर,परिचारिका,सफाई कामगार,आणि पोलिस कर्मचारी कोरोनाशी दोन हात करताना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे.यात पोलिस कर्मचारी कोरोना पोझिटीव्ह होण्याचे प्रमाण हे

वाडा – कोरोना योध्यातील डॉक्टर,परिचारिका,सफाई कामगार,आणि पोलिस कर्मचारी कोरोनाशी दोन हात करताना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे.यात पोलिस कर्मचारी कोरोना  पोझिटीव्ह होण्याचे प्रमाण हे पालघर जिल्ह्यात वाढताना दिसत आहे.त्यांच्या उपचारासाठी सार्वजनीक बांधकाम विभाग आणि पालघर पोलिस ठाणे यांच्या कडून वाडा तालुक्यातील पोशेरी येथील एका शाळेच्या इमारतीच्या विशेष डेडीकेटेड  कोव्हिड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे,पोलिस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे,जिल्हा शैल्यचिकित्सक कांचन वानेरे,अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख वाडा तहसीलदार उध्दव कदम,पोलिस निरीक्षक  जयकुमार सुर्यवंशी,वाडा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक प्रदीप जाधव यांच्या उपस्थित करण्यात आले.

पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेत्रांत कोरोना विषाणू संसर्ग वाढला आहे.त्याने आजवर एकूण संख्याची हजारी पार केली आहे. कोरोनाशी लढताना यावेळी कोरोना योद्धे काही ठिकाणी कोरोना संसर्गीत होत आहेत.यातील काही पोलिस योध्दे राज्यातील विविध भागात कोरोनाने संसर्गीत होउन मृत्युमुखी पडले आहेत. पोशेरी येथील या शाळेत ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधायुक्त हे सेंटर आहे. तेथे ५० बेड पोलिसांसाठी व ५० बेड हे इतर रुग्णांसाठी राखीव आहेत पालघर जिल्ह्यात ही दरम्यानच्या काळात पोलिस कर्मचारीवर्गाला कोरोनाची लागन झाल्याच्या घटना घडत आहेत.त्यांच्यासाठी या उद्देशाने हे विशेष डेडीकेटेड  कोव्हिड हेल्थ सेंटर वाडा येथे सुरु करण्यात आले आहे.