” अ” प्रभागात हायपोक्लोराईडचा वापर करून विशेष जंतूनाशक फवारणी

कल्याण :  कोरोना साथीला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधक उपाय त्याचाच एक भाग म्हणून  रविवारी  “अ” प्रभागात    सोडियम हायपोक्लोराईडचा वापर करून विशेष जंतूनाशक फवारणी   व डासांना  प्रतिबंध करण्यासाठी धुरावणी अशी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. 

क.डो.म.पा आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली   रविवारी  सकाळी  ७वा.  शहाड परिसरातील साई निर्वाण येथुन  “अ” प्रभाव क्षेत्र आधिकारी सुधीर मोकल , मुख्यआरोग्य निरिक्षक राजेश गावणकर, एस् आय् , प्रमोद नारखडे, अक्षय कराळे आणि कर्मचारी वर्गाच्या   उपस्थितीत ६ सिटी गार्ड ,   औषध फावरणी १२ हँन्ड पंप  , १ वेईकल मोउंटर फॉगीग मशीन , ५ हॅन्डपम्प मशीन  ६ हँड फॉगिंग मशीनच्या मदतीने कर्मचारी यांच्या सहकार्याने फवारणी व धुरावणी करण्यात आली.               

दुपारी तीन नंतर दोन अग्निशमन दलाच्या गाड्याच्या साहयाने सोडियम हायपोक्लोराईडचा फावरणी अटाळी गाव येथील विराट सुकंल मेन रोड परिसरात सुरू करण्यात आली. यासमयी “अ” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल, नगरसेविका हर्षाली थवील, नगरसेवक गोरख जाधव, पंकज पाटील, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थितीत होते. “नगरसेविका हर्षाली थवील यांनी प्रशासनाच्या जंतुनाशक फावरणी कामाचे कौतुक केले. धुरवाणी, फवारणी कामासाठी तसेच मुन्यषबळ वाढविण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले. ” नगरसेवक गोरख जाधव यांनी आपल्या वार्डचा परिसर मोठा असल्याने नियोजन  होत असले तरी फावरणी एक ते दोन दिवस केली गेली पाहिजे.”

“अ”प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल अ प्रभागक्षेत्रातील शहाड पासुन टिटवाळ्यापर्यंत सर्व प्रभागातील नगरसेवक यांचे फावरणी निमित्त सहकार्य लाभत जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्लम् परिसरात वेळोवेळी फावरणी केली जाते. लोकांनी सोशल डिस्टन नियमाचे पालन करीत सनिटायझरचा वापर करावा असे सांगितले.