लग्न सोहळ्याच्या व्हिडिओ शूट करून पोलिसांना पाठवावा लागणार; नाही तर…

राज्यात पून्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध आणखी कडक करण्यात आलेत. ठाणे पोलिस आयक्तालयाने लग्नसोहळ्यासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिला असताना आणखी एक नियम जारी केला आहे. लग्न सोहळ्याच्या व्हिडिओ शूट करून पोलिसांना पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    ठाणे : राज्यात पून्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध आणखी कडक करण्यात आलेत. ठाणे पोलिस आयक्तालयाने लग्नसोहळ्यासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिला असताना आणखी एक नियम जारी केला आहे. लग्न सोहळ्याच्या व्हिडिओ शूट करून पोलिसांना पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    ठाणे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शहरांमधील विवाह सोहळ्यात आता केवळ ५० जणांच्या उपस्थितीला पोलिसांची परवानगी मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे लग्न सोहळ्याच्या एक व्हिडिओ शूट करून पोलिसांना पाठवावा लागणार आहे. यात नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

    लग्न सोहळ्यांना उपस्थित राहणाऱ्या सर्वांना मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टन्सींगसह लग्न समारंभासाठी लोकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. ५० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय, संबंधित व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल केला जात आहे.