स्थायी समितीची बैठक गुगल मिटच्या माध्यमाद्वारे ऑनलाईन संपन्न

  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील लॉन टेनिस कोर्टवर डेडीकेटेड कोव्हिड सेंटर तयार करण्याच्या कामाच्या संविदेस मंजूरी देणे, डोंबिवली पूर्व जिमखाना येथील बास्केटबॉल कोर्टवर तात्पुरते डेडीकेटेड कोव्हिड सेंटर उभारणेकरिता कामाच्या संविदेस मंजूरी देणे, कल्याण पश्चिम येथील काळा तलाव व मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथील दैनंदिन देखभाल दुरुस्ती करण्याच्या कामाच्या संविदेस मंजूरी देणे असे एकूण १७ विषय मा. स्थायी समितीच्या मंजूरीसाठी व उर्वरित ४ विषय मा. स्थायी समितीच्या माहितीसाठी सादर करण्यात आले.

कल्याण :-  कोरोना साथीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी व त्याकरीता सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी आज प्रथमत: महापालिकेच्या मा. स्थायी समितीची बैठक गुगल मिटच्या माध्यमाद्वारे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली.  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील लॉन टेनिस कोर्टवर डेडीकेटेड कोव्हिड सेंटर तयार करण्याच्या कामाच्या संविदेस मंजूरी देणे, डोंबिवली पूर्व जिमखाना येथील बास्केटबॉल कोर्टवर तात्पुरते डेडीकेटेड कोव्हिड सेंटर उभारणेकरिता कामाच्या संविदेस मंजूरी देणे, कल्याण पश्चिम येथील काळा तलाव व मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथील दैनंदिन देखभाल दुरुस्ती करण्याच्या कामाच्या संविदेस मंजूरी देणे असे एकूण १७ विषय मा. स्थायी समितीच्या मंजूरीसाठी व उर्वरित ४ विषय मा. स्थायी समितीच्या माहितीसाठी सादर करण्यात आले.

सदर विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.  या मा. स्थायी समिती सभेस रजनी मिरकुटे, प्रियांका भोईर, गोरख जाधव, वामन म्हात्रे, गणेश कोट, पुरुषोत्तम चव्हाण, कासिफ तानकी, वरूण पाटील, मंदार टावरे, डॉ. सुनिता पाटील, सचिन खेमा, हर्षदा भोईर हे सदस्य ऑनलाईन उपस्थित होते आणि मा. स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे व निलेश म्हात्रे प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित होते.

सभेअंती सभेतील बरेचसे विषय प्राधान्याने कोव्हिड-१९ शी निगडीत असल्यामुळे सदर विषयांना Read & Confirm करण्याबाबत सुचना शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिल्यानंतर सर्व विषय Read & Confirm करण्यास मा. सभापती विकास म्हात्रे यांनी मान्यता दिली.