केंद्राच्या आदेशाप्रमाणे शाळा १५ ऑगस्टला सुरु कराव्यात – भाजप शिक्षक आघाडी कोकण विभागाची मागणी

कल्याण : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनस्तरावर जून वा जुलैमध्ये शाळा व महाविद्यालये सुरु करण्याच्या जोरदार साहसी हालचाली सरकारकडून सुरु

 कल्याण : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनस्तरावर जून वा जुलैमध्ये शाळा व महाविद्यालये सुरु करण्याच्या जोरदार साहसी हालचाली सरकारकडून सुरु आहेत.मात्र हे अत्यंत धोकादायक आणि कोरोनासंसर्ग प्रचंड प्रमाणात वाढविणारे आत्मघातकी पाऊल ठरेल. त्यामुळे केंद्राच्या आदेशा प्रमाणे शाळा १५ ऑगस्ट रोजी सुरु कराव्यात, अशी आग्रही मागणी भाजप शिक्षक आघाडी कोकण विभागाने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.  

इस्त्राईल, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इतर देशांनी कोरोना संसर्गाचा धोका ओळखून दिर्घकालीन शाळाबंदीची उचललेली पावले आपल्यासाठी  निश्चितच मार्गदर्शक आणि पथदर्शी आहेत, अशी माहिती भाजपा शिक्षक आघाडी राज्य सहसंयोजक विकास पाटील यांनी दिली. ऑनलाईन शिक्षण, दुरदर्शन,आकाशवाणी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया वा दैनिक वृत्तपत्र इ.माध्यमांचा प्रभावी वापर केल्यास प्रभावी पर्याय उभा करता येईल. मुलाचं, पालकांचं, शिक्षकांचं हित लक्षात घेता हट्टाला न पेटता, दूराग्रह न करता शाळा व महाविद्यालये कोरोना आटोक्यात आल्यानंतर अर्थात १५ ऑगस्टनंतरच सुरु करण्याचा तातडीने निर्णय घ्यावा आणि शाळा वा महाविद्यालये उघडण्याची तारीखही तात्काळ जाहीर करावी म्हणजे सर्व आघाड्यांवर नियोजन करणे सुलभ जाईल अशा आशयाचे निवेदन भाजप शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले असल्याची माहिती कल्याण जिल्हा संयोजक विनोद शेलकर यांनी दिली.