तुटवडा : एकदिवस पुरेल एवढाच लसींचा साठा ; लस आली नाही तर बुधवारी लसीकरण बंद

ठाणे महानगराची लोकसंख्या पाहता, हे डोस लवकरच संपण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी जास्तीचा साठा ठामपाकडे वर्ग करावा, अशा मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र पाठविले आहे.

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली माहिती

ठाणे : ठाणे महानगर पालिकेकडे राज्य आणि केंद्र सरकारने पाठविलेल्या कोव्यक्सीनचा साठा आता संपत आला आहे. सद्यस्थितीमध्ये ठाणे पालिकेकडे कोवॅक्सीनचे २ हजार ८० तर कोविशिल्डचे ६३ हजार ६७० डोस शिल्लक आहेत. हा साठा केवळ एक दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे मंगळवारी लस आल्या नाहीत तर बुधवारपासून लसीकरण बंद होऊ शकते अशी माहिती ठाणे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

ठाणे महानगराची लोकसंख्या पाहता, हे डोस लवकरच संपण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी जास्तीचा साठा ठामपाकडे वर्ग करावा, अशा मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र पाठविले आहे.

कोविड १९ प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने नियोजनबद्ध लसीकरण मोहिम सुरू केली. आजवर १,१२,४३७ इतके लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स, दुसर्‍याटप्प्यात ४५ ते ६० वयोगटातील सव्याधी व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण चालू आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरूवातीच्या काळात कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले.

तद्नंतर कोवॅक्सीनचे लसीकरण देण्यात सुरूवात केली आहे. ठाणे महापालिकेला प्राप्त झालेल्या लसीच्या साठ्यामधून सद्यस्थितीत लसीकरण सुरळीत सुरू आहे. मागील काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या देखील वाढत असल्याने लसीकरण मोहिम अधिक प्रभावी करणे आवश्यक असून महापालिकेने यापूर्वीच खाजगी रुग्णालयांमध्ये देखील लसीकरण सुरू केले असल्याने उपलब्ध साठा अपुरा पडणार आहे.

यासाठी महापालिकेकडे पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांना लेखी पत्र देवून ठाणे महापालिकेला जास्त साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रान्वये केली आहे. आतापर्यंत महापालिकेकडे कोविशिल्डचे एकूण १६२५०० डोस प्राप्त झाले असून, त्यापैकी ९४०४२ डोस देण्यात आले व ६३६७० डोस शिल्लक आहेत, तर कोवॅक्सीनचे एकूण ३९२२० डोस प्राप्त झाले असून त्यापैकी १८३९५ डोस देण्यात आले व २०८० डोस शिल्लक आहेत. एकंदरीत महापालिका कार्यक्षेत्रात कोविशिल्ड व कोवॅक्सीनचे एकूण ११२४३७ लसीकरण करण्यात आले आहे. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या डोसची संख्या व लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता, हे डोस अपुरे पडणार असल्याने याचा परिणाम लसीकरणावर होवू शकतो.

ठाण्याला ५ लाख डोस ची मागणी

ठाणे महापलिकेच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू करण्यात होते. पालिका हद्दीत ११ ठिकणी खासगी रुग्णालयात तर ४४ ठिकाणी महापलिकेच्या केंद्रवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. एक दिवस पुरेल एवढेच लस सद्या शिल्लक असून महापौर नरेश म्हस्के आणि पालिका प्रशासनाने राज्य सरकारला पत्राद्वारे ५ लाख लसीच्या डोस मिळावे अशी मागणी केली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.