अज्ञातांकडून गोहत्या- मोहने येथील खळबळजनक प्रकार

कल्याण : मोहने परिसरातील एन.आर.सी. कॉलनीलगत रिकाम्या असणाऱ्या घरातील गोठ्यातुन बांधलेल्या म्हशी आणि जर्सी गायीतील एका गाईला बाहेर काढुन गोहत्या केल्याची खळबळ जनक घटना आज पहाटे घडली. आज पहाटे

 कल्याण : मोहने परिसरातील एन.आर.सी. कॉलनीलगत रिकाम्या असणाऱ्या घरातील गोठ्यातुन बांधलेल्या म्हशी आणि जर्सी गायीतील एका गाईला बाहेर काढुन गोहत्या केल्याची खळबळ जनक घटना आज पहाटे घडली. आज पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान मोहने येथील एन.आर.सी कॉलनीतील रिकाम्या असणार्‍या घरातील गोठ्यात बांधलेल्या म्हशी आणि जर्सी गाय यातून  एका बांधलेल्या एका जर्सी गाईला बाहेर काढून तिची हत्या करून मास काढून नेल्याने येथे प्रचंड खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खडकपाडा पोलिसांनी याला दुजोरा दिला असून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

मोहने येथील गेल्या चाळीस  वर्षापासून दूध विक्रीचा धंदा करीत असणारे संतोष रामधनी सिंग हे दूध व्यवसायातुन  आपल्या कुटुंबियांची उपजीविका करीत आहेत. आज पहाटे चार साडेचारच्या सुमारास गाई व म्हशीचे दूध काढण्याकरता ते गेले असता त्यांची जर्सी गाय वेसण तोडून गेल्याचे लक्षात आल्याने तिचा लगेच शोध घेऊ लागले. गाय बांधलेल्या गोठ्यातून काही अंतरावर त्यांना जर्सी गाईचा पोटातील कोथळा बाहेर पडल्याचे निदर्शनास आला. 
यापूर्वी मोहने परिसरात जनावरांना विषारी औषध देऊन मारल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. मात्र गोठ्यातून जर्सी गाईला बाहेर काढून गोहत्या केल्याची घटना प्रथमच या शहरात घडली आहे. याबाबत पशुवैद्य अधिकारी पोटातील राहिलेल्या अवशेषांवर तपासणी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी, खडकपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
यासंदर्भात संतोष सिंग यांना विचारणा केली असता एखाद्या लोकलव्यक्तीच्या मदतीने कसाईने गोहत्या केली  असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये अर्ज देण्यात आला आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बोऱ्हाटे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.