maratha reservation protest

भिवंडी : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. या निर्णया विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहे. भिवंडीमध्येही मराठा समाजाने आंदोलन(bhivandi maratha community protest) केले.

भिवंडी शहरात तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर काही मोजक्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले. तसेच सायंकाळी आरक्षणाच्या निर्णयाबाबतच्या तीव्र भावनांचे निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. या लाक्षणिक उपोषणात राजेश चव्हाण, अनिल फडतरे, भूषण रोकडे, संभाजी खोपडे , सुनील पवार , निखिल माने , राकेश मोरे हे सहभागी होते पण या उपोषणामध्ये लक्ष वेधून घेतले ते सहा वर्षाच्या श्रावणी भोसले या चिमुरडीच्या घोषणांनी. श्रावणीच्या घोषणांमुळे उपोषणकर्त्यांनाही हुरुप आला.