माजी आमदार सुभाष भोईर यांची मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा लाखांची मदत

कल्याण : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढदिवसासाठी होणारा खर्च टाळत माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अकरा लाख रुपयांची मदत करीत सामाजिक दृष्टीकोन जपला आहे.

 कल्याण : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढदिवसासाठी होणारा खर्च टाळत माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अकरा लाख रुपयांची मदत करीत सामाजिक दृष्टीकोन जपला आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात पिंपरी, दिवा, एमआयडीसी, कोळे, उंबार्ली, गोळवली, लोकग्राम, कचोरे, भाल आदी ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुमारे एक हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा २ जून रोजी वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले व वाढदिवसावर होणारा खर्च टाळत सामाजिक हित जपण्यात आले आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विविध उपाययोजना खंबीरपणे राबवीत असताना मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार सुभाष भोईर यांचे कल्याण ग्रामीण मतदार संघात विविध साहित्याचे मोठ्या प्रमाणावर वाटप सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार सुभाष भोईर यांनी आज अकरा लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे जाहीर केले आहे.