
ठाणे मुंबईला जोडणारा हा पूल म्हणजे ठाणे मुंबईकारसाठी जीवनवाहिनी आहे. ठाणेकरांसाठी प्रशासनाच्या वतीने हे महत्त्वाचे पाऊल असून येणाऱ्या काळात वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आणि त्यामुळे पुलाच्या रुंदीकारणाचे काम सुरु झाले, कोपरी रेल्वे पुलाच्या भुयारी मार्गवर गर्डर टाकण्याच्या कामालाही सुरुवात असून येत्या काही दिवसात गर्डरचे काम पूर्ण होणार आहे.
- खासदार राजन विचारे यांचा पहाटेपर्यंत ठिय्या
ठाणे : कोपरी पुलाच्या आनंदनगर भुयारी मार्गावरील ७ गर्डर बसविण्याचे काम रात्रभर युद्धपातळीवर सुरू होते. शनिवारी रात्री १२ नंतर गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले होते पहाटे ५ पर्यंत हे काम सुरू ठेवण्यात आले होते. यशस्वीरित्या महत्वाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील आठवड्यात महत्वाचा असलेल्या रेल्वे पुलावर हे गर्डर टाकण्यात येणार असल्याचे यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा गर्डर बसवण्यासाठी ३५ मीटरची व ३५ मेट्रिक टन वजनाची आहे. हा गर्डर उचलण्यासाठी ५ क्रेन, ५ ट्रेलर व १ पुलर अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. एमएमआरडीएचे ५० ते ६० कामगार, वाहतूक विभागाचे १०० वॉर्डन यावेळी युद्धपातळीवर उपस्थित होते.
ठाणे मुंबईला जोडणारा हा पूल म्हणजे ठाणे मुंबईकारसाठी जीवनवाहिनी आहे. ठाणेकरांसाठी प्रशासनाच्या वतीने हे महत्त्वाचे पाऊल असून येणाऱ्या काळात वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आणि त्यामुळे पुलाच्या रुंदीकारणाचे काम सुरु झाले, कोपरी रेल्वे पुलाच्या भुयारी मार्गवर गर्डर टाकण्याच्या कामालाही सुरुवात असून येत्या काही दिवसात गर्डरचे काम पूर्ण होणार आहे.
एकूण सात गर्डर या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत. ३५ मीटर लांब आणि प्रत्येकी ३५ टन वजनाचे हे गर्डर आहेत. क्रेनच्या साहाय्याने हा गर्डर उचलण्यात आला. पुढील आठवड्याभरात रेल्वेकडूनही गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. सुमारे तीन महिन्यात मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ये-जा करणाऱ्या हजारो वाहन चालकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
२०११ साली हा पूल रेल्वेने धोकादायक ठरवला होता. दोन वर्षांपूर्वी या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर एमएमआरडीए आणि रेल्वेकडून याठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. दरम्यान काही महिन्यांनंतर हे काम पूर्ण होणार असून वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे यावेळी खासदार राजन विचारे यांनी सांगितले.
खासदार राजन विचारे यांचा रात्रभर ठिय्या
विशेष म्हणजे खासदार राजन विचारे यांनी पुलावर रात्री अकरा वाजता आपली उपस्थिती नोंदवली त्यानंतर पहिल्या गर्डरचे लाँचिंग होत असताना त्यांनी पूजा करून गर्डर काम सुरू केले सकाळी पहाटे ५ वाजेपर्यंत ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसले होते. जेव्हा सर्व गर्डर यशस्वीरित्या बसविल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी सर्व व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.
त्यावेळी त्यांच्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त बाळासाहेब पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त पालवे एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता प्रकाश भांबरे, कार्यकारी अभियंता विनय सुर्वे उपस्थित होते तसेच स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे , शिवसैनिक रमाकांत पाटील, किरण नाकती आदी यावेळी उपस्थित होते.