baravi dam project affected

ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणाच्या उंची वाढीमुळे मुरबाड तालुक्यातील काचकोली, मोहघर, तोंडली, मानिवली आणि संलग्न वाड्या-पाडे ही गावे बाधित झाली आहेत. गावांच्या पुनर्वसनासोबतच या गावांतील प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी घरटी नोकरी मिळावी, अशी मागणी गेली वीस वर्षे येथील प्रकल्पग्रस्त करीत होते. यासाठी बारवी प्रकल्प पीडित संघटना आणि येथील शेतकऱ्यांनी शासन दरबारी अनेक वर्षे आंदोलने, मोर्चे काढून लढा उभारला होता.

मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक आणि महानगरपालिका क्षेत्राची तहान भागविणाऱ्या बारवी धरण (Baravi Dam) बाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर यश आले. तब्बल वीस वर्षांहून अधिक काळ न्यायासाठी संघर्ष (Success to twenty years of struggle) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Maharashtra Industrial Development Corporation) नोकरीमध्ये सामावून घेण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात आज प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणाच्या उंची वाढीमुळे मुरबाड तालुक्यातील काचकोली, मोहघर, तोंडली, मानिवली आणि संलग्न वाड्या-पाडे ही गावे बाधित झाली आहेत. गावांच्या पुनर्वसनासोबतच या गावांतील प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी घरटी नोकरी मिळावी, अशी मागणी गेली वीस वर्षे येथील प्रकल्पग्रस्त करीत होते. यासाठी बारवी प्रकल्प पीडित संघटना आणि येथील शेतकऱ्यांनी शासन दरबारी अनेक वर्षे आंदोलने, मोर्चे काढून लढा उभारला होता. मागील तीन – चार वर्षांपासून या प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सुद्धा सोडविण्याची मागणी प्रकल्पग्रस्त करत होते.

दोन वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सकारात्मक विचार करून या प्रकल्पातील तरुणांना नोकरीत सामावून घेण्याबाबतचे धोरण ठरवून शासन निर्णय घेतला होता. याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी पात्र ठरविलेल्या २०९ तरुणांना पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. मंत्रालयात आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच प्रकल्प पीडितांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. आलेत. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उर्वरित तरुणांना येत्या दोन-तीन दिवसांत आदेश देण्यात येणार आहेत.

महानगरपालिका देखील भरती करणार 

बारवी धरणाचे पाणी घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिका देखील पुढील टप्प्यात प्रकल्पाग्रस्त तरुणांना सेवेत सामावून घेणार आहेत. ठाणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार किसन कथोरे आणि समिती सदस्य नगरसेवक भगवान भालेराव यांनी आवाज उठविल्यानंतर बारवीचे पाणी वापरणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच महानगरपालिकांनी याबाबतचा ठराव पारित केला आहे. एम.आय.डी.सी.आणि नगरपालिकांमध्ये एकूण १२०४ प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली जाणार आहे.