ठाण्यात आतापर्यंत ११ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया ; छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला यश

सद्यस्थितीत कोरोनाझाल्यानंतर म्युकरमायकोसिस लक्षणे असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तात्काळ दाखल करून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 5 तर सध्या 4 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत.

    ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यापूर्वी ५ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर आता अजून ४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले असून आजपर्यंत एकूण ९रुग्ण उपचारांनंतर सुखरूप घरी परतले आहेत.

    कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नवीन बुरशीजन्य रोगावर वेळेत योग्य उपचार घेतल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा करू शकतो. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने हे शक्य करून दाखवले असून आजपर्यंत ९ म्युकरमायकोसिस रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आहे.

    सद्यस्थितीत कोरोनाझाल्यानंतर म्युकरमायकोसिस लक्षणे असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तात्काळ दाखल करून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ५ तर सध्या ४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत.

    म्युकरमायकोसिसच्या उपचार पद्धतीसाठी डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट,भूलतज्ञ आदी डॉक्टरांच्या एकत्रित टीमने या सर्व शस्त्रक्रिया केल्या आहेत.