कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने क्वारंटाइन सेंटरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. त्यातच अनेकजणांनी कोरोनाच्या भीतीने स्वतःचे जीवन संपविले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना  भिवंडीतील रांजणोली येथील आमंत्रण क्वारंटाइन सेंटर येथे घडली आहे. प्रशांत आंबेकर (वय-40) यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी  इमारतीच्या पाचव्या मजल्यावरू  उडी घेऊन आत्महत्या केली आहे.त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार , आंबेकर हे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रहिवासी होते. त्यांचात कोरोनाची लक्षण दिसत असल्याने त्यांना आमंत्रण क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होत.कोरोनाच्या भीतीनं  आंबेकर यांनी आत्महत्या केली असल्याचे बोललं जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.