Supreme Court seeks relief from Shiv Sena MLA Pratap Saranaik in money laundering case
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि अंमलबजावणी संचालनालय

एमएमआरडीए सुरक्षा रक्षक कंत्राटमद्ये ३० टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील ५० टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचे हा ५० टक्के हिस्सा प्रताप सरनाईक यांचा आहे. असे टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्सचे मालक राहूल नंदा सांगितले होते.

ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Saranaik ) यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. सरनाईकांच्या घरासह मुंबईतील इतर १० जागांवर एकाच वेळी ईडीने धाड टाकली होती. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांच्याही घरी ईडीची टीम दाखल झाली होती. टॉप्स ग्रुपमध्या आर्थिक गैरव्यवहार ( money laundering case) केल्याचा ठपका आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात ईडीने प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ताब्यात घेत ६ तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईकांना ईडीने सहा वेळा समन्स धाडूनही ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court ) प्रताप सरनाईक यांना दिलासा दिला आहे.

ईडीने प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मागील महिन्यात २४ तारखेला ईडीने सरानाईकांच्या घरावर छापा टाकला होता. ईडीच्या या कारवाई विरोधात प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना दिलासा दिला आहे. ईडीला कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

एमएमआरडीए सुरक्षा रक्षक कंत्राटमद्ये ३० टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील ५० टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचे हा ५० टक्के हिस्सा प्रताप सरनाईक यांचा आहे. असे टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्सचे मालक राहूल नंदा सांगितले होते.