cycling on fort

कल्याणातील एका अवलियाने नववर्ष स्वागताचा अनोखा पायंडा पाडला आहे. सुशांत करंदीकर असं या अवलियाचे नाव असून त्यांनी नववर्षानिमित्त २००१ पासून गेल्या २० वर्षांमध्ये महाराष्ट्रातील थोडे थोडके नव्हे तर तब्बल १०० अवघड किल्ले सर केले आहेत आणि तेही सायकलवरून.(crossing 100 forts by cycle)

दत्ता बाठे, कल्याण : नवीन वर्षाची(new year) सुरुवात म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या जंगी पार्ट्या, नयनरम्य रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी. गेल्या काही वर्षांत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा(new year celebration) हा जणू काही अघोषित नियमच झाला आहे. मात्र या क्षणभंगुर आणि भौतिक देखाव्यात न रमता कल्याणातील एका अवलियाने नववर्ष स्वागताचा अनोखा पायंडा पाडला आहे. सुशांत करंदीकर असं या अवलियाचे नाव असून त्यांनी नववर्षानिमित्त २००१ पासून गेल्या २० वर्षांमध्ये महाराष्ट्रातील थोडे थोडके नव्हे तर तब्बल १०० अवघड किल्ले सर केले आहेत आणि तेही सायकलवरून.(crossing 100 forts by cycle)

cycle on fort

सह्याद्री सायकल मोहिमेंतर्गत सुशांत यांनी सायकल घेऊन महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचा माथा गाठला आणि नववर्षाचे अत्यंत वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. यंदाच्या नववर्षाचे स्वागत स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडासह घोसाळगड, तळागड, मानगडावर करण्यात आले. विशेष म्हणजे सह्याद्री सायकल मोहिमेतील हा १०० वा किल्ला होता. ज्यामध्ये सुशांत करंदीकर यांच्यासह कृष्णा नाईक, दीपाली कंपाली, दिवाकर भाटवडेकर, वरद मराठे, चिन्मयी ढवळे, मन नाईक आणि दैविक कंपाली हे सर्व वयोगटातील सहभागी झाले होते. या सर्वांनी तब्बल २९० किलोमीटर सायकल प्रवास करत ही ४ गडकिल्ल्यांची मोहीम पूर्ण करण्यात आल्याचे सुशांत करंदीकर यांनी सांगितले.

आतापर्यंत सुशांत करंदीकर यांनी राजगड, पन्हाळगड, विशाळगड, कळसुबाई, नाणेघाट, लोहगड, विसापूर, तिकोना अशा अनेक महत्वपूर्ण किल्ल्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये अनेक छोटेखानी आणि सागरी किल्ल्यांवर सायकलवरून चढाई करण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांपासून सातत्याने ही मोहीम राबविण्यात येत असून विदेशाप्रमाणे आपल्याकडेही ‘माऊंटन बायकिंग’चा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठीही आपण हा खटाटोप करीत असल्याचेही करंदीकर यांनी यावेळी सांगितले.